ETV Bharat / bharat

Diwali bonus News: केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर, 'ही' पात्रता असणाऱ्यांना मिळणार लाभ

author img

By PTI

Published : Oct 18, 2023, 8:56 AM IST

दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळची बोनस मंजूर केला.

Diwali bonus News
Diwali bonus News

नवी दिल्ली Diwali bonus News - केंद्र सरकारनं निमलष्करी दल आणि सशस्त्र दलांसह गट सी आणि नॉन-राजपत्रित गट ब श्रेणीतील केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी बोनस मंजूर केला आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी सांगितलं की, या अॅड-हॉक बोनसचे पेमेंट हे जास्तीत जास्त कमाल मर्यादा 7,000 रुपये मासिक असणार आहे.

जे कर्मचारी 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत होते, त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा ( Diwali bonus News) बोनस मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 2022-23 मध्ये किमान सहा महिने सेवा बजाविली आहे, त्यांना हा बोनस मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार बिगर उत्पादकता लिंक्ड बोनसचं प्रमाण सरासरी वेतन किंवा गणना कमाल मर्यादा, यापैकी जे कमी असेल त्या आधारे तयार केले जाणार आहे. सहा दिवसांचा आठवडा किंवा प्रत्येक वर्षासाठी किमान 240 दिवस तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ (प्रत्येक वर्षात 206 दिवस तीन वर्षे किंवा त्याहून अधिक) कार्यालयात काम करणारे कर्मचारीही बोनससाठी पात्र असणार आहेत.

टाटा स्टीलकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर- सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांनाही दिवाळीचा बोनस मिळण्याची प्रतिक्षा आहे. खासगी कंपन्यांमध्ये यंदा सर्वप्रथम टाटा स्टीलनं कर्मचाऱ्यांकरिता बोनस मंजूर केला. टाटा स्टीलनं टाटा वर्कर्स युनियनसह (TW) सामंजस्य करारावर 5 सप्टेंबरला स्वाक्षरी केली. या करारामुळे कर्मचाऱ्यांना 2022-2023 या वर्षासाठी कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस म्हणून एकूण 314.70 कोटी रुपये मिळणार आहेत. कंपनीनं जारी केलेल्या निवेदनानुसार, सामंजस्य करारांतर्गत कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस म्हणून दिलेली एकूण रक्कम 314.70 कोटी रुपये असेल.

गतवर्षी आरोग्य सेविकांसह बीएमसी कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस- महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांही दिवाळी बोनसची प्रतिक्षा आहे. गतवर्षी शिंदे फडणवीस सरकारनं मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना 22 हजार 500 रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस जाहीर केला होता. कोविडच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचं कौतुकदेखील मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. मुंबईतील कोविडची परिस्थिती नियंत्रणात राखण्यात डॉक्टर्स, सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. विकास कामांवर खर्च झालाच पाहिजे. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहनही मिळाले पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा-

  1. Wheat Prices: गव्हावर प्रत्येक क्विंटल बोनस द्यावा, भाव कोसळण्याआधी नियोजन करावे- शेतकऱ्यांची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.