न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय

author img

By

Published : Aug 6, 2021, 3:36 PM IST

सर्वोच्च न्याायलय

सर्वोच्च न्यायालयातील पीठासमोर धनबाद येथील न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणी सू मोटोवर सुनावणी करण्यात आली आहे. यावेळी सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी न्यायाधीशांवरील हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली - धनबाद येथील न्यायाधीशांच्या मृत्यू प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी सीबीआय आणि इंटेल ब्युरोवर कडक ताशेरे ओढले आहेत. या दोन्ही संस्थांनी न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी काही केले नसल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी म्हटले आहे. हे गंभीर विधान आहे. पण, खरे आहे, याची जाणीव असल्याचेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील पीठासमोर धनबाद येथील न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणी सू मोटोवर सुनावणी करण्यात आली आहे. यावेळी सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी न्यायाधीशांवरील हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की जर हायप्रोफाईल प्रकरण असेल तर न्यायाधीशांना धमकाविणे आणि त्यांचा छळ करणे हा नवा ट्रेण्ड आला आहे. न्यायाधीशांचा मानसिक छळ करण्यासाठी आक्षेपार्ह मेसेजही पाठविण्यात येतात. राज्य सरकारकडून न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी काहीही करण्यात येत नाही. त्यांच्या निवासस्थानी काही सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरही न्यायाधीशांवर हल्ले झाले आहेत.

हेही वाचा-विरोधी पक्षांनी जंतर-मंतरकडे वळवला मोर्चा; शेतकरी आंदोलनात सहभागी

झारखंड सरकारने मांडली बाजू

झारखंडमध्ये तरुण न्यायाधीशांचा कोळसा माफियांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याबाबत महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी राज्य सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे. झारखंडच्या अधिवक्त्याने न्यायाधीशांच्या निवासस्थानी सुरक्षा भिंती व अतिरिक्त सुरक्षा आहे. न्यायाधीशांच्या मृत्यूप्रकरणी 22 सदस्यांची एसआयटी स्थापन केली आहे. त्याचदिवशी ऑटोचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची पोलीस चौकशी सुरू आहे.

न्यायाधीशांच्या हत्येचे प्रकरण झारखंड राज्य सरकारने सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयने गुरुवारी न्यायाधीशाच्या मृत्यूप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे. यावर तुम्ही जबाबदारी झटकली का, अशी सर्वोच्च न्यायालयाने टिपण्णी केली. न्यायाधीशांच्या सुरक्षेव्यवस्थेबाबत सद्यस्थिती सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. या प्रकरणावर 17 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

हेही वाचा-कोव्हिशिल्ड घेऊन परेदशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 कोटीचा निधी; असा करा अर्ज

काय आहे धनबाद न्यायाधीश मृत्यू प्रकरण?

जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (District and Sessions Judge) उत्तम आनंद (Judge Uttam Anand) रोजच्याप्रमाणे बुधवारी (29 जुलै) सकाळी मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले होते. त्यादरम्यान त्यांना रिक्षाने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली पडले. एका रिक्षा चालकाने त्यांना SNMMCH पोहोचवले. तेथेच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यात त्यांना रिक्षाने पाठीमागून धडक दिल्याचे दिसून आले. उत्तम आनंद हे रंजय हत्याकांडांची सुनावणी करत होते.

हेही वाचा-अफगाणिस्तानवर रशियाने बोलावली बैठक, चीन-पाकिस्तान सहभागी; भारताला आमंत्रण नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.