ETV Bharat / bharat

Shahnawaz hussain भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश

author img

By

Published : Aug 18, 2022, 10:43 AM IST

भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्या अडचणी court orders to register fir against shahnawaz hussain वाढल्या आहेत. एक महिलेने शाहनवाज यांच्यावर बलात्काराचा order of fir against shahnawaz hussain in rape case आरोप केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

fir against shahnawaz hussain in rape case
रेप प्रकरणी शाहनवाज हुसैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पटना भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्या अडचणी court orders to register fir against shahnawaz hussain वाढल्या आहेत. एक महिलेने शाहनवाज यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना order of fir against shahnawaz hussain in rape case अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने पोलिसांन तपासासाठी 3 महिन्यांची मुदत दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा Panjiri Food Video श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या प्रसादासाठी विशेष पंजिरी रेसिपी

काय आहे प्रकरण 2018 मध्ये एका महिलेने भाजप नेते शाहनवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. शाहनवाज यांनी छतरपूर फार्महाऊसवर आपल्यावर बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप होता. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे महिलेचे म्हणणे होते. आता या प्रकरणात शाहनवाज अडचणीत येण्याची शक्यत आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांची असंवेदनशील वृत्ती अनाकलनीय असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. एफआयआर नोंदवताना पोलिसांकडून कुचराई होत असल्याचे सर्व वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते, असे निरीक्षण न्यायालयाने सांगितले.


मात्र, कनिष्ठ न्यायालयात आपल्या वतीने सादर केलेला अहवाल अंतिम अहवाल नसल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी केला. महिलेच्या आरोपांमध्ये दम नसून शाहनवाज हुसैन यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनी काढला होता.

हेही वाचा Prostitution in Jabalpur वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पिता पुत्रासह 10 जणांना अटक, मुंबई नागपुरातून यायच्या मुली

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.