ETV Bharat / bharat

Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी आणीबाणी दरम्यानची 'ही' आठवण सांगितली, 'इतके' दिवस होते तुरुंगात

author img

By

Published : Jun 25, 2023, 5:28 PM IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी आग्रा येथे पोहोचले. तेथे एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळावर बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला.

Rajnath Singh
राजनाथ सिंह

आग्रा : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी एक दिवशीय दौऱ्यासाठी आग्र्याला पोहोचले आहेत. तेथे त्यांनी फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघातील कागरोलला भेट दिली. राजनाथ सिंह यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, '1975 मध्ये याच दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली होती. काँग्रेसने याच दिवशी लोकशाहीची हत्या केली होती. हा काळा अध्याय सदैव स्मरणात राहील. त्यावेळी वयाच्या 23 व्या वर्षी मी तुरुंगवास भोगला होता. मी 16 महिने तुरुंगात होतो.'

Rajnath Singh
राजनाथ सिंह यांची आग्रा येथे जाहीर सभा

'पंतप्रधान मोदींना हटवण्याचा कट' : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेस पंतप्रधान मोदींना हटवण्याचा कट रचत आहे. त्यासाठी पाटण्यात बैठक झाली. काँग्रेस म्हणते की देशात लोकशाही नाही, पण तसे नाही. भाजप जर लोकशाहीचा गळा घोटत आहे तर हिमाचल, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात त्यांचे सरकार कसे बनले? संरक्षण मंत्री म्हणाले की, सध्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. उरीमध्ये पाकिस्तानने लज्जास्पद कृत्य केले होते. त्याला आम्ही जोरदार प्रत्युत्तर दिले.

'मोदींनी देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत केले' : संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, भाजपचे सरकार गावे, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. मोफत रेशन सुविधाही दिली जात आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची मान विदेशात उंचावली. भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे काम पंतप्रधानांनी केले. 2014 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती, आता पाचव्या स्थानावर आहे.

भाजपकडून देशभर जनसंपर्क अभियान : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपने केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि उपलब्धी लोकांपर्यंत नेण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. महासंपर्क अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप घरोघरी संपर्क अभियान राबवणार आहे. भाजपच्या जनसंपर्क अभियानाला गती देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आग्रा येथे आले आहेत. या अंतर्गत त्यांनी फतेहपूर सिक्री लोकसभेच्या कागरोल येथील किडवाई इंटर कॉलेज मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले.

हेही वाचा :

  1. Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' ने सन्मानित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.