2018 ते 2020 काळात नक्षलविरोधी कारवायांमध्ये 625 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 28, 2021, 6:59 AM IST

Maoist violence

मे 2018 ते 2020 या तीन वर्षांच्या काळात 2,168 नक्षलविरोधी कारवायांमध्ये जवळपास 625 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती लोकसभेत लल्लू सिंह आणि नितेश गंगा देव यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.

नवी दिल्ली - देशात नक्षलवादी घटनांच्या प्रमाणाची माहिती समोर आली आहे. मे 2018 ते 2020 या तीन वर्षांच्या काळात 2,168 नक्षलविरोधी कारवायांमध्ये जवळपास 625 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती लोकसभेत लल्लू सिंह आणि नितेश गंगा देव यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांत नक्षलवादी घटनांमध्ये कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. 2018 मध्ये 833 घटनांमध्ये 240 लोकांचा मृत्यू झाला. तर 2019 मध्ये 670 घटनांमध्ये 202 मृत्यू तर 2020 मध्ये 665 घटनांमध्ये 183 जण मरण पावले.

पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त अभियानात 3 एप्रिल, 2021 रोजी नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 22 सुरक्षा जवान शहीद झाले. यात सीआरपीएफचे 8 जवान आणि 14 पोलीस कर्मचारी होते. नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने 2015 मध्ये एक राष्ट्रीय धोरण व कृती आराखडा तयार केला होता. ज्यात सुरक्षेसंदर्भात उपाय, विकासात्मक पुढाकार, स्थानिक समुदायाचे अधिकार निश्चित केले होते.

रतात सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी आयईडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सुरक्षा दलाच्या पुस्तिकेनुसार राष्ट्रीय महामार्ग, राज्यांतर्गत महत्त्वाचे मार्ग किंवा सुरक्षा दलाच्या कॅम्पजवळ स्फोट करण्यासाठी वापरात येणारी ही आयईडी उपकरणं नक्षलवादी वर्षानुवर्ष जमिनीखाली किंवा झुडपांमध्ये लपवून ठेवतात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.