ETV Bharat / bharat

हिमाचल प्रदेश: मुसळधार पावसाने गावातील घरांमध्ये वाहून आला राडारोडा

author img

By

Published : Jul 12, 2021, 4:52 PM IST

Updated : Jul 12, 2021, 5:48 PM IST

नौहराधार तालुक्यातील गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राडारोडा वाहून येत आहे. त्यामुळे अद्रक, टोमॅटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Debris came in Himachal Pradesh
घरांमध्ये वाहून आला राडारोडा

शिमला- अतिवृष्टीचा हिमाचल प्रदेशला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने गिरीपार क्षेत्रातील नौहराधार तालुक्यातील गुमन खड्ड गावातील घरांमध्ये राडारोडा वाहून आला आहे.

नौहराधार तालुक्यातील गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये राडारोडा वाहून येत आहे. त्यामुळे अद्रक, टोमॅटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये, याकरिता ग्रामस्थ पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा-VIDEO : हिमाचलमध्ये ढगफुटी.. मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे रुप, कार व अन्य वाहने गेली वाहून

ग्रामीण महसूल अधिकारी (Rural Revenue Officer) नीरज म्हणाले, की घटनास्था जाऊन नुकसानीचा अहवाल करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीही येथील घरांमध्ये पावसामुळे राडारोडा वाहून आला होता. खड्ड्यांजवळ मजबूत भिंत तयार करण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही समस्या सुटू शकते.

  • हिमाचल प्रदेश में तेज बारिश से आयी प्राकृतिक आपदा के संबंध में मैंने मुख्यमंत्री श्री @jairamthakurbjp जी से बात की है। राहत कार्यों के लिए NDRF की टीमें शीघ्र वहाँ पहुँच रही हैं। गृह मंत्रालय स्थिति को निरंतर मॉनिटर कर रहा है। केंद्र की ओर से हिमाचल को हर संभव मदद दी जाएगी।

    — Amit Shah (@AmitShah) July 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा- VIDEO : हिमाचलमध्ये ढगफुटी.. मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे रुप, कार व अन्य वाहने गेली वाहून

केंद्राकडून शक्य ती हिमाचल प्रदेशला मदत करू- अमित शाह

अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीबाबत मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याची चर्चा झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मदत कार्यासाठी एनडीआरएफची टीम लवकरच पोहोचणार आहे. गृह मंत्रालय परिस्थितीवर सातत्याने देखरेख करीत आहे. केंद्राकडून शक्य ती हिमाचल प्रदेशला मदत केली जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.


हिमाचलमध्ये ढगफुटी-

हिमाचल प्रदेशमध्ये मान्सूनने पुनरागमन केले आहे. कांगडा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पर्यटन नगरी धर्मशालाच्या भागसूनाग परिसरात पाण्याच्या तेज प्रवाहामुळे रस्त्यावरील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. नाल्यांना आलेल्या पुरामुळे हॉटेल आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धर्मशालामधील चैतरू गावात पाण्याच्या तेज प्रवाहामुळे एक इमारत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्याच्या किनारी असणारी घरे व हॉटेल्सबरोबर बाजारपेठेचेही मोठे नुकसान झाले आहे. शक्यता वर्तवली जात आहे की, पर्वत रांगेत ढगफुटी झाल्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. दरम्यान पावसाचे पाणी रहिवाशी परिसरात घुसल्याने लोकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा-Heavy Rain : रत्नागिरीतील राजापुरात पूरस्थिती, बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा

Last Updated :Jul 12, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.