ETV Bharat / bharat

Threat to Sidhu Moose Wala Parents : सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबासह सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, राजस्थानातून आला ईमेल

author img

By

Published : Mar 5, 2023, 9:23 AM IST

Updated : Mar 5, 2023, 9:29 AM IST

सिद्धू मुसेवालाच्या पालकांना ऑनलाइन धमकी मिळाली आहे. राजस्थानातील अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने ही धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मानसा पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.

Threat to Sidhu Moose Wala Parents
सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाला धमकी

चंदीगड : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये मुसेवालाच्या पालकांना २५ एप्रिलपर्यंत नोकरीवरून काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ईमेलमध्ये अभिनेता सलमान खानचाही उल्लेख करण्यात आला आहे. मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.

धमकीच्या ईमेलमध्ये सलमान खानचाही उल्लेख : पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आहे. हा ईमेल राजस्थानमधील जोधपूर येथून आल्याचे तपासात समोर आले आहे. राजस्थानमध्ये छापा टाकला असता, हा ईमेल अवघ्या 14 वर्षांच्या मुलाने केल्याचे उघड झाले. ईमेलमध्ये या मुलाने मुसेवाला यांच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या मुलाने कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला या बाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

धमकी देणाऱ्यास अटक केली : सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांना ईमेलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीला मानसा पोलिसांनी अटक केली आहे. एसएसपी गौरव तुरा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेलद्वारे धमकी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या समन्वयाने आरोपी महिपाल हा जोधपूर, राजस्थान येथील रहिवासी आहे. त्याला 2 मोबाईलसह अटक करण्यात आली आहे. बहादूरगड येथून अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

एजे बिश्नोईच्या नावाने इंस्टाग्रामवर आयडी बनवला : मानसा पोलिसांनी सांगितले की, आरोपी महीनपालने एजे बिश्नोईच्या नावाने इन्स्टाग्रामवर आयडी बनवला आहे. सोपू ग्रुपला फॉलो करणाऱ्या आरोपीने सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी व इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी ही पोस्ट टाकली होती. त्याची सखोल चौकशी करून जे तथ्य समोर येईल त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

मुसेवालाची हत्या झाली होती : पंजाब सरकारने प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची सुरक्षा काढून टाकली होती. सुरक्षा काढून घेतल्यानंतर पुढच्याच दिवशी 29 मे 2022 ला सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. घटनेच्या वेळी मुसेवाला याचे मित्र आणि भाऊ त्याच्यासोबत गाडीत होते. हल्लेखोरांनी मुसेवाला याच्यावर 30 राऊंड गोळीबार केला होता. या हल्यात तो जागीच ठार झाला.

हेही वाचा : Gangster Terror Nexus Cases : एनआयएने दहशतवादाशी संबंधीत प्रकरणात दिल्ली आणि हरियाणामधील 5 मालमत्ता जप्त केल्या

Last Updated :Mar 5, 2023, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.