ETV Bharat / bharat

Update On Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ आज दुपारनंतर आणखी तीव्र होणार; भारतावर काय होणार परिणाम?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 12:55 PM IST

Update On Cyclone Tej : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार तेज चक्रीवादळ आज तीव्र चक्री वादळात बदलण्याची शक्यता आहे. मात्र, चक्रीवादळाचा महाराष्ट्राचा गुजरातवर कोणताही परिणाम होणार नाही.

Update On Cyclone Tej
Update On Cyclone Tej

नवी दिल्ली Update On Cyclone Tej : अरबी समुद्रात 'तेज' चक्रीवादळ तयार झालं असून पुढील 24 तासांत हे चक्रीवादळ धोक्याचं रुप धारण करु शकतं. तसंच पुढील 24 तासांत त्याचं रुपांतर आणखी खोल दाबात होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. हवामान विभागानं या चक्रीवादळाचं वर्णन अतिशय तीव्र चक्रीवादळ असं केलंय. तेज चक्रीवादळ 21 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता तीव्र होईल असं सांगितलं होतं. मात्र आता हे वादळ 22 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र चक्री वादळात रुपांतरित होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच या चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • VSCS Tej lay centered at 0530 IST of 22nd Oct over WC & adj SW Arabian Sea about 240 km ESE of Socotra (Yemen), 600 km SSE of Salalah (Oman), and 620 km SE of Al Ghaidah (Yemen). Very likely to intensify further into an Extremely Severe Cyclonic Storm in the forenoon of 22nd Oct. pic.twitter.com/K8kMq3nUMD

    — India Meteorological Department (@Indiametdept) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

येमेन-ओमान किनार्‍याकडे वाटचाल : भारतीय हवामान विभागानं आपल्या ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ 25 ऑक्टोबरच्या पहाटे अल घैदा (येमेन) आणि सलालाह (ओमान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती देताना Iहवामान विभागानं म्हटलंय की, शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्यापूर्वी सोकोत्रा ​​(येमेन) च्या 900 किमी पूर्व-आग्नेय, सलालाह विमानतळाच्या (ओमान) 1,170 किमी आग्नेय आणि अल घायदाह (येमेन) पासून 1,260 किमी पूर्वेस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. सध्या तेज चक्रीवादळ यमनच्या साकोत्रा किनाऱ्यापासून 550 किलोमीटर पूर्व-दक्षिण पूर्वेकडं आहे. हवामान खात्यानं पुढं म्हटलंय की, WML बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्रात केंद्रित आहे. हे पारादीप (ओडिशा) पासून सुमारे 620 किमी दक्षिणेस, दिघा (पश्चिम बंगाल) च्या 780 किमी दक्षिणेस आहे आणि त्याचा प्रभाव बांगलादेशातील पुपारा येथून 900 किमी SSW वर देखील दिसू शकतो.

चक्रीवादळाचा भारतावर काय परिणाम : चक्रीवादळामुळं दक्षिणपूर्व आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय. यामुळं भारतीय तटरक्षक दलानं आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टीवर काम करणाऱ्या मच्छीमारांना बंदरावर परत जाण्याचा सल्ला दिलाय. भारतीय तटरक्षक दलानं चेन्नई, आंध्र आणि तामिळनाडू किनारपट्टी भागत अनेक जहाजं तैनात केली आहेत. तसंच मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलीय. 'तेज' चक्रीवादळाचा महाराष्ट्र गुजरात किनारपट्टीला सध्यातरी कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.

हेही वाचा :

  1. Cyclone Biparjoy updates: बिपरजॉय बनले धोकादायक, गुजरातच्या सात जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस; मुंबईतील जोरदार वादळामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम
  2. Snow Storm In America : अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे तेलगू जोडप्याचा मृत्यू, आणखी एकाचा शोध सुरू
  3. thunderstorm alert for many district of bihar आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका, बिहारमध्ये वादळाचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.