ETV Bharat / bharat

COVID-19 Vaccine : 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण नोंदणी सुरू, जाणून घ्या प्रक्रिया

author img

By

Published : Jan 1, 2022, 5:09 PM IST

देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची ( Corona Vaccine for Children ) लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी ( Registration ) सुरु झाली आहे. Co-WIN वर थेट नोंदणी करता येणार आहे.

लसीकरण
COVID-19 Vaccine

नवी दिल्ली - जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची (Corona Vaccine for Children ) लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी (Corona Vaccine Registration for Children ) सुरु झाली आहे. Co-WIN वर थेट नोंदणी करता येणार आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलं 1 जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील. नोंदणीसाठी 10 वीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसतील, असं डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितलं.

गेल्या वर्षात 25 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून नोंदणीला सुरुवात झाली असून लसीकरणाची सुरुवात 3 जानेवारीपासून केली जाणार आहे. यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून कोविन पोर्टलवर (Cowin Portal) नोंदणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तसेच 10 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

अशी करा नोंदणी -

  • सर्व प्रथम Covin App वर जा.
  • तुमचा मोबाइल क्रमांक टाका.
  • ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन होईल.
  • आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.
  • निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा.
  • आता लिंग आणि जन्म तारीख निवडा.
  • सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
  • आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
  • नोंदणी केल्यावर मिळणारा आयडी आणि सिक्रेट कोड लसीकरण केंद्रावर, तुम्हाला द्यावा लागेल.
  • लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून तुमच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

हेही वाचा - Monkey In Washim : जखमी माकडाचा जीव वाचविण्यासाठी इतर माकडांनी केला तासभर रास्ता रोको

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.