ETV Bharat / bharat

आता व्हॉट्सअ‌ॅपद्वारे काही सेकंदातच मिळणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

author img

By

Published : Aug 9, 2021, 7:49 AM IST

Updated : Aug 9, 2021, 8:17 AM IST

रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशात 50,68,10,492 कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. रविवारी एका दिवसांत 55,91,657 इतके कोरोना लसीचे डोस दिले गेले.

mansukh mandviya
मनसुख मांडविया

नवी दिल्ली - देशातील नागरिकांना आता कोरोनाची लस घेतल्यानंतर काही सेकंदातच लस घेतल्याचे प्रमाणपत्र व्हॉट्सअ‌ॅपद्वारे मिळणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या कार्यालयाने रविवारी याबाबतची माहिती दिली. सध्या, नागरिक कोविन पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर त्यांचे कोरोना लस प्रमाणपत्र डाऊनलोड करत आहेत.

व्हॉट्सअपद्वारे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागणार?

MyGov Corona Helpdesk द्वारे तीन टप्प्यात आता हे कोरोना लस प्रमाणपत्र व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना काही सेकंदातच उपलब्ध होणार आहे.

  1. +91 9013151515 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणे.
  2. यानंतर covid certificate असे टाईप करून या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करणे.
  3. त्यानंतर आलेल्या ओटीपी एंटर करणे. यानंतर काही सेंकदातच कोरोना लस प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे, असे मंडविया यांच्या कार्यालयाने ट्विट केले.

दरम्यान, कोरोना व्यवस्थापनावरुन सरकारवर नेहमी हल्ला करणारे, ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, जेव्हा सरकारने चांगले कार्य केले तेव्हा मी नेहमीच त्यांची प्रशंसा केली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच प्रशंसनीय आहे, असे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशात 50,68,10,492 कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. रविवारी एका दिवसांत 55,91,657 इतके कोरोना लसीचे डोस दिले गेले. देशात यावर्षी 16 जानेवारी पासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली. यानंतर 1 मार्चपासून 45 वर्ष आणि त्यावरील तसेच 60 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली. तसेच 1 मेपासून 18 वर्षांपासून वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.

Last Updated :Aug 9, 2021, 8:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.