ETV Bharat / bharat

देशात कोरोनामुळं दोघांचा मृत्यू, जाणून घ्या किती रुग्ण आढळले?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 9:35 PM IST

COVID 19
COVID 19

COVID 19 Update : गेल्या 24 तासांत देशात कोविडची 573 नवीन प्रकरणे आणि 2 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 4,44,76,550 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून, बरं होण्याचा दर 98.8 टक्के आहे.

हैदराबाद COVID 19 Update : भारतात मंगळवारी कोविड-19 ची 573 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली. यासह संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 4,565 झाली आहे.

24 तासात दोन मृत्यू : कोविडमुळे गेल्या 24 तासात दोन मृत्यू नोंदवल्या गेले. यापैकी एक कर्नाटकातील तर दुसरा हरियाणातील आहे. 5 डिसेंबरपर्यंत देशभरातील दैनंदिन केसेसची संख्या दुहेरी आकड्यांपर्यंत घसरली होती. परंतु नवीन व्हॅरीयंट आणि थंड हवामानामुळे केसेसमध्ये पुन्हा वाढ झाली.

4.5 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग : 2020 च्या सुरुवातीला सुरू झालेल्या साथीच्या रोगाच्या दैनंदिन संख्या एकेकाळी लाखोंमध्ये होती. त्यानंतर देशभरात सुमारे चार वर्षांत 4.5 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आणि 5.3 लाखांहून अधिक मृत्यू झाले. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे. तर बरं होण्याचा दर 98.81 टक्के आहे.

निम्मे रुग्ण केरळमध्ये नोंदवले गेलेत : वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत. INSACOG च्या मंगळवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोविड-19 उप-प्रकार JN.1 चे एकूण 263 प्रकरणे आढळून आली आहेत. यापैकी जवळपास निम्मे केरळमध्ये नोंदवले गेलेत. हा विषाणू आतापर्यंत 10 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळला आहे.

कोविड 19 च्या JN.1 व्हॅरीयंटचे कोणत्या राज्यात किती रुग्ण आढळले :

  • केरळ (133)
  • गोवा (51)
  • गुजरात (34)
  • दिल्ली (16)
  • कर्नाटक (8)
  • महाराष्ट्र (9)
  • राजस्थान (5)
  • तामिळनाडू (4)
  • तेलंगणा (2)
  • ओडिशा (1)

कोरोनापासून बचावासाठीची खबरदारी :

  1. दिवसातून वारंवार हात स्वच्छ धुवा. यासाठी साबण किंवा अल्कोहोल मिश्रित हॅण्डवॉशचा वापर करा.
  2. खोकताना आणि शिंकताना टिश्यू पेपरचा वापर करा. त्यानंतर तो ताबडतोब कचऱ्यात फेकून द्या आणि हात स्वच्छ धुवा.
  3. ताप आणि खोकला असलेल्या व्यक्तीचा संपर्क टाळा.
  4. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  5. कच्चे किंवा न शिजवलेल्या प्राण्यांच्या मांसाचं सेवन करू नका.

हे वाचलंत का :

  1. भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच; 841 नवीन रुग्ण, 'अशी' घ्या खबरदारी
  2. देशात कोविडचे 702 नवीन रुग्ण, सहा रुग्णांचा मृत्यू
  3. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एंट्री, महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.