ETV Bharat / bharat

काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी; पूर्ण राज्यात करणार प्रतिज्ञा यात्रा

author img

By

Published : Sep 15, 2021, 5:32 PM IST

काँग्रेसने पश्चिमी उत्तर प्रदेश, बुंदेलखंड-लखनौ, पूर्वांचल, अवध और पश्चिमी देवीपाटनच्या क्षेत्रानुसार आणि जाती-धर्मानुसार नेत्यांची यात्रेतील मार्गावर नियुक्ती केलेली आहे. ज्या क्षेत्रात ज्या जातीचे वर्चस्व, त्या क्षेत्रात संबंधित नेत्यांवर यात्रेची जबाबदारी सोपविलेली आहे.

काँग्रेस
काँग्रेस

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रतिज्ञा यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा 21 सप्टेंबरला संपणार आहे. काँग्रेसची यात्रा एकूण 12,242 किलोमीटरची असणार आहे. यात्रेतील मार्ग आणि नेत्यांची नावे काँग्रेसने निश्चित केली आहे. या यात्रेत काँग्रेस पूर्ण ताकद पणाला लावणार आहे.

काँग्रेसने प्रतिज्ञा यात्रेत सर्व मोठ्या नेत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. काँग्रेसने पश्चिमी उत्तर प्रदेश, बुंदेलखंड-लखनौ, पूर्वांचल, अवध और पश्चिमी देवीपाटनच्या क्षेत्रानुसार आणि जाती-धर्मानुसार नेत्यांची यात्रेतील मार्गावर नियुक्ती केलेली आहे. ज्या क्षेत्रात ज्या जातीचे वर्चस्व, त्या क्षेत्रात संबंधित नेत्यांवर यात्रेची जबाबदारी सोपविलेली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व प्रभारी यात्रेत समन्वयाकडे लक्ष देणार आहे. ही यात्रा 103 विधानसभा आणि 500 गावांमधून जाणार आहे.

काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी

हेही वाचा-SCO SUMMIT व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून पंतप्रधान होणार सहभागी; परराष्ट्रमंत्री थेट परिषदेत राहणार हजर

पश्चिम उत्तर प्रदेशमधील यात्रेची यांच्यावर असणार जबाबदारी

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रतिज्ञा यात्रेची जबाबदारी राष्ट्रीय सचिव धीरज गुर्जर आणि तौकीर आलम यांच्यावर सोपविणार आहे. ही यात्रा सहारनपूर, शामली, मुजफ्फरनगर, बिजनौर, मेरठ, हापुड, अमरोहा, मुरादाबाद रामपूर आणि बरेलीमार्गे जाणार आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश भागामध्ये मुस्लिम आणि जाट यांचा दबदबा आहे. त्यामुळे या समाजातील नेत्यांवरच काँग्रेसने जबाबदारी सोपविली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या यात्रेत एक ब्राम्हण, दोन जाट, एक खत्री, एक जाटव, 7 मुस्लिम, एक व्यापारी (बनिया), एक एससी जाटव आणि एख सैनी ओबीसी यांचा समावेश आहे. यात्रेत नसीमुद्दीन सिद्दीकी, हरेंद्र मलिक, इमरान प्रतापगढी, आचार्य प्रमोद कृष्णम, गजराज सिंह, प्रदीप माथुर, बेगम नूर बानो, राशिद अल्वी, मीम अफजल, विवेक बंसल, नरेश सैनी, मसूद अख्तर, विजेंद्र सिंह बॉक्सर, मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

हेही वाचा-हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया, पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

बुंदेलखंड-लखनौ यात्रेत हे होणार सहभागी

बुंदेलखंड-लखनौ यात्रेची जबाबदारी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी प्रदीप नरवाल, रोहित चौधरी आणि सचिन नाईक यांच्यावर असणार आहे. बुंदेलखंड लखनौ यात्रेत झाशी, जालौन, हमीरपूर, महोबा, बांदा, चित्रकुट, फतेहपूर, कानपूर नगर ग्रामीण, कानपूर ग्रामीण, कानपूर शहर, उन्नाव व लखनौचा समावेश आहे.

हेही वाचा-दिल्लीतील सहा संशयित दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी, मुंबईतील एकाचा समावेश, महाराष्ट्रही होता निशाण्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.