ETV Bharat / bharat

Piyush Goyal: काँग्रेस खासदार गोहिल यांच्याकडून पीयूष गोयल यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस

author img

By

Published : Mar 14, 2023, 4:49 PM IST

Piyush Goyal
Piyush Goyal

काँग्रेस नेते शक्ती सिंह गोहिल यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी विदेशात देशविरोधी वक्तव्य केले असा आरोप करत पियुष गोयल यांनी त्यांचे नाव घेतले होते. त्याला विरोध करत काँग्रेस नेते शक्ती सिंह गोहिल यांनी ही नोटीश पोठवली आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार शक्ती सिंह गोहिल यांनी मंगळवारी राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली. गोयल यांनी लोकसभेच्या एका सदस्यावर आरोप करून वरिष्ठ सभागृहाच्या नियमांचे आणि कार्यपद्धतीचे उल्लंघन केल्याचा आरोप गोहिल यांनी या नोटीसमध्ये केला आहे. दरम्यान, गेली दोन दिवसांपासून संसदेसह राज्यसभेत मोठ्या प्रमाणात गजारोळ सुरू असून दोन्ही सभागृहाचे कामकाज वारंवार बंद करण्यात आले आहे.

आरोप संदेच्या नियमांना धरून नाहीत : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना नियम 188 अन्वये पाठवलेल्या नोटीसमध्ये गोहिल म्हणाले की, गोयल यांनी नियम 238 चे उल्लंघन केले आहे ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की कोणत्याही सदस्याने दुसर्‍या सदनातील सदस्य किंवा सदस्याविरुद्ध कोणतेही बदनामीकारक आणि आरोप करणारे शब्द वापरू नये. मात्र, गोयल यांनी असे आरोप केले आहेत. ते संदेच्या नियमांना धरून नाहीत. तसेच, गोहिल यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे, की 13 मार्च रोजी गोयल यांनी राज्यसभेतील अन्य सभागृहातील सदस्याने केलेल्या काही टिप्पण्यांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस खासदाराने राज्यसभेच्या अध्यक्षांनी भूतकाळात दिलेल्या काही सूचनांचा संदर्भ दिला, ज्यात असे म्हटले होते, की येथे इतर सभागृहाच्या सदस्यावर आरोप केले जाऊ शकत नाहीत.

विरोधी पक्षनेत्याने माफी मागितली पाहिजे असे म्हटले : नोटीसमध्ये, काँग्रेस नेत्यांनी असा युक्तिवाद केला, की एका सभागृहात दुसर्‍या सभागृहाच्या सदस्याचा उल्लेख केला जात नाही ही जुनी प्रथा आहे. ते म्हणाले की 'हे लक्षात घेण्यासारखे आहे की पीयूष गोयल यांनी वारंवार (अ) लोकसभेच्या माननीय सदस्याबद्दल बोलले आहे आणि ते जे काही सांगत आहेत त्यामध्ये सत्तता नव्हती. गोयल यांनी लोकसभेच्या सदस्यावर सत्य नसलेल्या आणि जाणीवपूर्वक अपमानास्पद टीका केली असही ते म्हणाले आहेत. तसेच, यामध्ये महत्वाचे म्हणजे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री गोयल यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यसभेत त्यांचे नाव न घेता केलेल्या विधानाचा विषय उपस्थित केला आणि विरोधी पक्षनेत्याने माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे. त्यावरून गेली दोन दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभेत मोठा गोंधळ सुरू आहे.

हेही वाचा : Jaya Bachchan Got Angry In Rajyasabha: भाषणात व्यत्यय आल्याने जया बच्चन संतापल्या, उपराष्ट्रपतींनी केली मध्यस्थी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.