ETV Bharat / bharat

ICSE, ISC Result 2021: सीआयएससीईकडून दहावी व बारावीचे निकाल जाहीर.. 'या' वेबसाईटवर पाहू शकता निकाल

author img

By

Published : Jul 24, 2021, 3:35 PM IST

Updated : Jul 24, 2021, 3:40 PM IST

CISCE ने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार 31 जुलै पूर्वी 10वी व 12वी परीक्षेचे निकाल घोषित केले आहेत. काउंसिलने या संबंधात शुक्रवारी माहिती दिली होती, की आज दुपारी तीन वाजता म्हणजे 24 जुलै रोजी निकाल जाहीर केले जातील त्यानुसार आज अधिकृत वेबसाइट cisce.org वर निकालाची लिंक अॅक्टिव करण्यात आली आहे.

cisce-announced-result
cisce-announced-result

नवी दिल्ली - काउंसिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन ( CISCECISCE ) ने इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एजुकेशन ( ICSE ) 10 वी आणि इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC ) 12 वी परीक्षेचे निकाल आज घोषित केले आहेत.

विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाइट www.cisce.com वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. CISCE बोर्डाचे सचिव गेरी अराथून यांनी म्हटले होते, की 10 वी व 12 परीक्षेचे निकाल 24 जुलै रोजी दुपारी तीन वाजता जाहीर केले जातील.

बोर्डाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहून 10 व 12 दोन्ही वर्गाच्या पीरक्षा रद्द केल्या होत्या. या वर्गाचा निकाल बोर्डाने निर्धारित केलेल्या पर्यायी मूल्यांकन नीतीच्या आधारावर घोषित करण्यात आले आहेत. यासाठी काउंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन (CISCE) ने 10वी आणि 12वी वर्षाचे परीक्षांसाठी इव्हॅल्यूएशन असेसमेंट स्कीम तयार केली होती.

CISCE चे म्हणणे आहे, की अंतर्गत मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या कुशलतेचे मोजमाप करते व सर्वश्रेष्ठ तीन विषयांमधील सरासरी गुण देऊन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक क्षमतेचे आकलन करते. परिषदेने 2015 ते 2019 बरोबर 2002 बोर्ड परीक्षांच्या अंकांचे विश्लेषण केले आहे.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल -

निकाल पाहण्यासाठी आईएससीईची अधिकृत वेबसाईट www.cisce.org किंवा www.results.cisce.org वर क्लिक करा.

Last Updated :Jul 24, 2021, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.