ETV Bharat / bharat

लसीच्या अभावामुळे लसीकरणाची गती मंदावली; पी. चिदंबरम यांची केंद्रावर टीका

author img

By

Published : May 16, 2021, 4:15 PM IST

पी. चिदंबरम
पी. चिदंबरम

16 जानेवरीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, लसीकरणाचा वेग कमी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लसीकरणाच्या संख्येत घट झाल्यावरून रविवारी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले.

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. देशात 16 जानेवरीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, लसीकरणाचा वेग कमी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लसीकरणाच्या संख्येत घट झाल्यावरून रविवारी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. दररोज लसीकरणाचा आकडा का कमी होत आहे?, असा सवाल त्यांनी केला.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचे नाव न घेता चिदंबरम यांनी त्यांच्यावर टीका केली. लसीचा अभावामुळे लसीकरणाची गती झाली आहे. परंतु निष्ठावंत आणि आज्ञाधारक आरोग्यमंत्री हे नाकारतील, असे टि्वट चिदंबरम यांनी केले. शुक्रवारी केवळ 11 लाख डोस देण्यात आले आहेत. यामुळे मे महिन्यातील लसीकरणाचा दैनंदिन सरासरी आकडा घसरत आहे. 2 एप्रिल रोजी देशात 42 लाख डोस देण्यात आले होते, असे चिदंबरम यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

देशात किती लसीकरण?

सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची सूचना मान्य केली आहे. आतापर्यंत देशात 18 कोटी 22 लाख 20 हजार 164 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 17 लाख 33 हजार 232 जणांना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा - चटका लावणारी एक्झिट! वाचा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.