चरणजितसिंह चन्नी पंजाबचे नवे कॅप्टन, विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

author img

By

Published : Sep 19, 2021, 6:00 PM IST

चरणजितसिंह चन्नी
चरणजितसिंह चन्नी ()

चरणजितसिंह चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यंमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. त्यांची काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत सुखजिंदरसिंह रंधावा हे पंजाबचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी चरणजितसिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

चंदीगड - चरणजितसिंह चन्नी हे पंजाबचे नवे मुख्यंमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. त्यांची काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत सुखजिंदरसिंह रंधावा हे पंजाबचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी चरणजितसिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केलेले ट्विट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केलेले ट्विट

सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची होती चर्चा

सुखजिंदर सिंह रंधावा हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्यची चर्चा होती. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलल्या जात होते.

'कॅप्टन माझ्या वडिलांसारखे'

जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही. पंजाबचा विकास करणे हेच आमचे काम आहे. मी कॅप्टन यांचे दुसरे रुप आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. कॅप्टन आमच्या डोक्यावरील मुकुट आहेत, असे रंधावा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

अंबिका सोनींनी नाकारली ऑफर

काँग्रेस नेत्या अंबिका सोनींनी दिल्लीत पंजाबमधील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना एक शीख व्यक्ती पंजाबचा मुख्यमंत्री असावा, असे म्हटले आहे. अंबिका सोनींना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडून विचारणा झाल्याची माहिती समोर आली होती. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता एक शीख व्यक्ती पंजाबचा मुख्यमंत्री असावा, अशी माझी आज नव्हे तर 50 वर्षांपासूनची धारणा आहे. त्यामुळे आपण याला नकार दिला, असे सोनी म्हणाल्या.

सिद्धूंच्या नावाला अमरिंदर सिंग यांचा विरोध

सूत्रांच्या माहितीनुसार, जर पक्ष श्रेष्ठींनी सिद्धू यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर हिंदू आणि दलित समाजातून एक-एक उपमुख्यमंत्री किंवा या दोन्हीपैकी एका समुदायाचा उपमुख्यमंत्री आणि दुसऱ्या समुदायाच्या नेत्याला प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद दिले जाऊ शकते. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. सिद्धू यांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप करत त्यांना मुख्यमंत्री केले तर देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याचे भाकित त्यांनी वर्तवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.