ETV Bharat / bharat

Dearness Allowance Increases : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ!

author img

By

Published : Mar 25, 2023, 8:51 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. 1 जानेवारी 2023 पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाईल.

Anurag Thakur
अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी महागाई भत्ता आणि महागाई सवलत चार टक्क्यांनी वाढवून 42 टक्के केली आहे. याचा फायदा सुमारे 69.76 लाख पेन्शनधारक आणि 47.58 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 12,815.60 कोटी रुपयांचा परिणाम होईल.

महागाई भत्ता आणि सवलतीत वाढ : 1 जानेवारी 2023 पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाईल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्यात आली आहे. अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा एक अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2023 पासून महागाई सवलत देण्यास मंजुरी दिली आहे. नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, वाढीव हप्त्याची किंमत वाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन किंवा पेन्शनच्या 38 टक्क्याच्या विद्यमान दरापासून 4 टक्के वाढ दर्शवेल. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित मंजूर सूत्रानुसार असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरवरील सबसिडी सुरूच : मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, जागतिक कारणांमुळे गरीब लोकांवर बोजा पडू नये यासाठी पंतप्रधानांनी 2022 मध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 सिलिंडर आणि या सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी दिली होती. आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल झाला नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला गेला. ते पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी तागाचा एमएसपी 4,750 रुपये प्रति क्विंटल होता, तो आता 300 रुपयांनी वाढवून 5,050 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. हे सरासरी उत्पादन खर्चावर अंदाजे 63 टक्के नफा देईल. याचा निर्णयाचा फायदा सुमारे 40 लाख ज्यूट शेतकऱ्यांना होणार आहे.

हेही वाचा : Hindenburg New Report: हिंडेनबर्ग रिसर्च नवा धमाका करण्याच्या तयारीत, अदानींनंतर आता 'टार्गेट'वर कोण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.