ETV Bharat / bharat

Breaking News Live : कळंबमध्ये मराठा आरक्षण महामोर्चा संपन्न, भरपावसात लाखो मराठा समाज बांधवांनी नोंदवला सहभाग

author img

By

Published : Sep 19, 2022, 6:39 AM IST

Updated : Sep 19, 2022, 10:59 PM IST

breaking news
ब्रेकिंग न्यूज फाईल फोटो

22:58 September 19

कळंबमध्ये मराठा आरक्षण महामोर्चा संपन्न, भर पावसात लाखो मराठा समाज बांधवांनी नोंदवला सहभाग


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी कळंब येथे मराठा आरक्षण महामोर्चा काढण्यात आला

हातात भगवे झेंडे,डोक्यावर भगव्या टोप्या, हाती घोषणांचे फलक घेत, कळंब येथे सोमवारी दुपारी संपन्न झालेल्या मराठा महामोर्चात "एक मराठा लाख मराठा" अशाच स्वरूपाचे विराट दर्शन झाले,
कळंब शहरातील विद्याभवन हायस्कूल च्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. क्षणाक्षणाला मोर्चात मराठा समाज बांधव व भगिनींची संख्या वाढत गेली, कळंब शहर माणसांच्या गर्दीने फुलून गेले पहावे तिकडे शहरात मोर्चेकर्‍यांची गर्दीच गर्दी झाली होती,
अतिशय शिस्तप्रीय असलेला हा मोर्चा नगरपरिषद शाळा क्रमांक १ च्या मैदानात स्थिरावला आणि येथे मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले
यावेळी भर पावसात उपस्थित विराट जनसमुदायासमोर मराठा समाजातील मुलींनी मुद्देसूदपणे भाषण केले,लाखो मोर्चेकरी उपस्थित असताना केवळ सात मुलींनी उपविभगीय अधिकरी यांना मागण्यांचे निवेदन दिले

22:58 September 19

जिल्ह्यातील ग्रा.पं. निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा : खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातही फुलले कमळ

ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज लागलेल्या निकालात बहुतांश ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले असून, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातही कमळ फुलले आहे.Body:नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील ९१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल मतदान झाले. झालेल्या मतदानाची मतमोजणी आज दि. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील ८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते, पैकी ६ ग्रामपंचायतींवर भाजपाने निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. कंधार तालुक्यातील हनुमंतवाडी, रामानाईक तांडा तर लोहा तालुक्यातील उमरा, गवंडगाव, घोटका, लांडगेवाडी, हिराबोरी तांडा यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील किनवट, माहूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. यातील ५९ ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजय झाला आहे. भारतीय जनता पार्टीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आ. भीमराव केराम यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली किनवट-माहूरमध्ये भाजपाचे कमळ फुलविले आहे. टाकळी, डिग्रीधानोरा, सत्तीगुडा, मांडवी आदी ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील या निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील शेवटच्या व अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतही कॉंग्रेस हद्दपार होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यांचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. केराम, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह भाजपातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया देतांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. भ्रष्टाचारमुक्त शासन आणि पारदर्शक सरकार यामुळे लोककल्याणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शेवटच्या घटकाचा विकास हाच भाजपाचा ध्यास असल्याने ग्रामीण भागातील जनतेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व हवे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या चाव्या भाजपाकडे दिल्या आहेत. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने आपल्यास निवडून दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवत विकासाची कामे करून तळागाळापर्यंत समृद्धी पोहोचवावी, असे आवाहन केले आहे.C

22:57 September 19

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबर पक्ष, ग्रामपंचायतीत 88 जागांपैकी 41 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व..

नाशिक नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबर पक्ष, ग्रामपंचायतीत 88 जागांपैकी 41 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व..Body:नाशिक जिल्ह्यातील नाशिक,दिंडोरी आणि कळवण या तालुक्यातील 88 ग्रामपंचायती पैकी
41 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस चा झेंडा फडकला आहे,त्या पाठोपाठ शिवसेना 13 भाजप 5,माकप 8,काँग्रेस 4 इतर 16 तर शिंदे गटाला 1 ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले,नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आलं त्या पाठोपाठ,बीजेपी 4 शिवसेना 4, कॉग्रेस 2 आणि अपक्ष 1 या पद्धतीने निकाल समोर आला आहे.

# दिंडोरीत शिंदे गटाला मोठा धक्का..
शिंदे गटाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षाचा पराभव झाला असून दिंडोरी तालुक्यातील तळेगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सोनाली चारोस्कर विजयी झाल्या आहेत.तर शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातुन हा महत्वाचा निकाल मानला जात आहे.


# कळवण मध्ये राष्ट्रवादी
कळवण येथे 22 पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या.रविवारी एकूण 19 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार,माजी आमदार जे.पी.गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दहा ठिकाणी राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.

# स्वराज्य संघटनेचा पहिला विजय
नाशिकच्या गणेश गावातून रूपाली ठमके या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या असून,ग्रामपंचायत निवडणुकीत रूपाली ठमकेंना स्वराज्य संघटनेतर्फे पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वराज्य संघटनेचे पुरस्कृत उमेदवार देण्यात आलेले होते.काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपतींनी स्वराज्य संघटना सुरू करत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, स्वराज्य संघटना हा सध्या पक्ष नसून, स्वराज्य संघटना पुरस्कृत म्हणून निवडणुकीत उमेदवारी देण्याचे कामं या संघटनेने केले होते. त्यातील गणेश गावातून ठमकेंना स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली होती. त्यात त्या विजयी झाल्या आहेत.

# नाशिक तालूका 16 जगाचा निकाल

1) वाडगाव - वनिता सुनील निबेकर 552 राष्ट्रवादी

2) धोंडेगाव - प्रवीण बाबुराव बॅंडकुळी 779 कॉग्रेस

3) जतेगाव - सरला बाळू निबेकर - 884 बीजेपी

4) नाईकवाडी - भरताबाई विलास बादाडे - 570 राष्ट्रवादी

5) नागळवादी - रूपंचांद गोपाळा पोटींडे - 257
राष्ट्रवादी

6) दुगाव - ज्ञानेश्वर गवे - 477 राष्ट्रवादी

7) राजूर बहुला - सीमा गुलाब ससाणे - 508 बीजेपी

8) गंगावरहे - लक्ष्मण जगन्नाथ बेडकुळे - 452 कॉग्रेस

9) वासळी - अशा उत्तम खेतरे - 388 - शिवसेना

10) गणेशगाव - रुपाली ठामके - 449 शिवसेना

11) सरूळ - मोहन दगळे - 442 बीजेपी

12) ओझरखेड बाबुराव दिवे- 849 राष्ट्रवादी

13) राजेवाडी - रेणुका टोपले - 256 शिवसेना

14) दहेगाव - शीतल बॅंडकुळी - बिनविरोध शिवसेना

15) इंदिरा नगर - चांगुणा बेंडकुळी - 488 बीजेपी

16) गोवर्धन - गोविंद दंबले 1371 अपक्ष



नाशिक जिल्हा ग्रामपंचायत अंतिम आकडेवारी आकडेवारी

एकूण जागा - 88

राष्ट्रवादी - 41
शिवसेना - 13
भाजप - 5
माकप - 8
शिंदे गट - 1
काँग्रेस - 4
इतर - 16
------------------
एकूण - 88

22:57 September 19

मालाड परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही मात्र स्मशानभूमीवर कारवाई होते उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई उपनगरातील मालाड येथील एरंगळ समुद्रनकिनाऱ्यावरील कोळी बांधवांची स्मशानभूमी कोणतीही सुनावणी न घेता पाडण्यात आल्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर सोनवणे दरम्यान राज्य सरकारला सरकारले आहे तसेच अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करण्यात येत नाही मात्र एका व्यवसायिकाच्या तक्रारीवरून शमशान भूमी व कारवाई करण्यात आल्याने राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 21 सप्टेंबर पर्यंत तहकूब केली आहे.

22:56 September 19

विदर्भाच्या मागासलेपणाकरिता विदर्भातील नेते जबाबदार विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा घणाघाती आरोप



विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भाच्या मागासलेपणासाठी विदर्भाचेचं नेते जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. Body:शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे गट सातत्याने बंडखोरांवर हल्ले करत आहे. विदर्भात बंडखोरांना घेरण्याची जबाबदारी दानवे यांच्याकडे देण्यात आली असल्याने ते सर्व ११ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

22:56 September 19

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मकजनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा- मुख्यमंत्री


मुंबई - राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी पुकारलेले ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर मागे घेत असल्याचे महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने जाहीर केले.

22:56 September 19

संध्याकाळी सहानंतर एम रुग्णालयात पेशंटला प्रवेश का दिला जात नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विचारला जाब

अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थान,नागपूर (एम्स) मध्ये संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रुग्णांना भर्ती करण्यासाठी प्रवेश दिला जात नाही अशी थेट तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एम्सच्या संचालकांकडे केली आहे. एम्सच्या फाउंडेशन डे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेकडो लोकांनी या संदर्भात नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली ,त्यामुळे आज गडकरींनी थेट जाब विचारला आहे.Body:नागपूर शहर हे मध्य भारतातील मेडिकल हब म्हणून ओळखलं जाऊ लागलं आज,त्यामुळे नागपुरचं नाही तर संपूर्ण विदर्भ,मराठवाडा, आंध्रप्रदेश,तेलंगणा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेकडो पेशंट रोज येत असतात. एम्स रुग्णालयाची दर्जेदार सुविधा नागपुरात सुरू झाल्यामुळे लोक मोठ्या आशेने नागपूरच्या एम्स मध्ये येतात मात्र सहा नंतर त्यांना प्रवेश दिला जात नसल्याने रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली

22:49 September 19

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला अटक

पहलगाम येथे सुरू असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, 18 सप्टेंबर रोजी, संध्याकाळी 7:15 वाजता शूटिंग संपत असताना, एका बदमाशाने क्रू मेंबर्सवर दगडफेक केली. त्यानुसार पहलगाम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. बदमाशाची ओळख पटली आणि अटक करण्यात आल्याचे अनंतनाग पोलिसांनी सांगितले.

22:35 September 19

कुत्र्याने मटण खाल्याच्या कारणावरून पित्याने केली गोळी झाडून मुलीची हत्या ; पोलिसात गुन्हा दाखल


उस्मानाबाद तुळजापूर तालुक्यातील कार्ला ग्रामस्थ- गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती- पत्नींनी दि. 18.09.2022 रोजी 17.00 वा. सु. कार्ला येथे त्यांची मुलगी- काजल मनोज शिंदे, वय 22 वर्षे हिस कुत्र्याने मटन खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन पिता- गणेश भोसले यांनी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडून तीला गंभीर जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला.

22:34 September 19

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण२०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल: मुख्यमंत्री शिंदे


मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मुंबई मनपाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोस्टर रोडची पाहणी केली. दरम्यान कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.

18:55 September 19

नंदुरबार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अंतिम निकाल, वाचा सविस्तर

नंदुरबार ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

*एकूण जागा* १४९

भाजपा ८३

शिवसेना शिंदे गट २९

काँग्रेस २८

राष्ट्रवादी ०५

स्थानिक विकास आघाडी ०४

18:08 September 19

दिल्लीच्या बाहेर साजरा होणार आर्मी डे परेड

भारतीय लष्कराने दरवर्षी 15 जानेवारी रोजी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड राष्ट्रीय राजधानीबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी आर्मी डे परेड सदर्न कमांड एरियामध्ये आयोजित केला जाणार आहे.

18:04 September 19

खारघर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

खारघर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे पदाधिकारी रुपेश पाटील याच्यावर व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी व सहकाऱ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

18:01 September 19

उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये दूरध्वनी करून महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्यास बेड्या

मुंबईतील उच्चभ्रू परिसरातील घरांमध्ये दूरध्वनी करून तेथील महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या ४९ वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपी पेडर रोड येथील एका व्यावसायिक महिलेच्या घरी दूरध्वनी करून धमकावत होता. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी खंडणी, विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. इम्तियाज अब्दुल खुर्दुस अन्सारी(४९) असे अटक आरोपीचे नाव आहे.

17:41 September 19

काँग्रेस अध्यक्षपदी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर

मुंबई - आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. सदर बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रांताध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार होते .
सदर बैठकीत २ महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

ठराव क्रमांक १

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला.

ठराव क्रमांक २

सदर बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करावी असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
हा ठराव सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला.

17:09 September 19

भाड्याच्या गाड्या चोरून विकणारा गजाआड 21 लाखांच्या गाड्या जप्त तर दोघांना अटक


वाहतूक परमिट च्या गाड्या चोरणाऱ्या एका अट्टल चोराला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकूण २१ लाख रुपये किमतीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट जप्त करण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे.

15:16 September 19

नंदुरबार तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाने मारली बाजी?

नंदुरबार तालुक्यातील मतमोजणी पूर्ण

एकूण ग्रामपंचायती ६९

भाजपा३९

शिंदे गट २८

काँग्रेस०१

राष्ट्रवादी०१

15:15 September 19

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचेच पारडे जड

पुणे जिल्ह्यात ६१ पैकी ५५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

13:48 September 19

ग्रामपंचायत निवडणूक निकाल

ग्रामपंचायत निवडणूक निकाल

छ.संभाजीनगर-ग्रा.जिल्हा

एकूण जागा :-14

1) शिवसेना(शिंदे)- 8

2) भाजपा - 3

3) उध्दव सेना - 2

4) राष्ट्रवादी - 1

13:44 September 19

नाशिक तालूका 16 जागांचा निकाल

नाशिक तालूका 16 जागांचा निकाल

1) वाडगाव - वनिता सुनील निबेकर 552 राष्ट्रवादी

2) धोंडेगाव - प्रवीण बाबुराव बॅंडकुळी 779 कॉग्रेस

3) जतेगाव - सरला बाळू निबेकर - 884 बीजेपी

4) नाईकवाडी - भरताबाई विलास बादाडे - 570 राष्ट्रवादी

5) नागळवादी - रूपंचांद गोपाळा पोटींडे - 257 राष्ट्रवादी

6) दुगाव - ज्ञानेश्वर गवे - 477 राष्ट्रवादी

7) राजूर बहुला - सीमा गुलाब ससाणे - 508 बीजेपी

8) गंगावरहे - लक्ष्मण जगन्नाथ बेडकुळे - 452 कॉग्रेस

9) वासळी - अशा उत्तम खेतरे - 388 - शिवसेना

10) गणेशगाव - रुपाली ठामके - 449 शिवसेना

11) सरूळ - मोहन दगळे - 442 बीजेपी

12) ओझरखेड बाबुराव दिवे- 849 राष्ट्रवादी

13) राजेवाडी - रेणुका टोपले - 256 शिवसेना

14) दहेगाव - शीतल बॅंडकुळी - बिनविरोध शिवसेना

15) इंदिरा नगर - चांगुणा बेंडकुळी - 488 बीजेपी

16) गोवर्धन - गोविंद दंबले 1371 अपक्ष

13:44 September 19

आता सर्वत्र फक्त भाजप आणि शिंदेंच्या सेनेचाच झेंडा फडकणार; पुढचे लक्ष मुंबई महापालिका - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुका असुदेत किंव्हा मुंबई महानगरपालिका निवडणूक आता फक्त भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचाच झेंडा फडकणार असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर आले यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा सुद्धा मोठा विजय होताना दिसत आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी यापुढे फक्त भाजप आणि शिंदे यांच्या गटाचाच झेंडा लागणार असल्याचे त्यांनी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील 70 हुन अधिक अंगणवाडींना आवश्यक साहित्य आणि पोषण आहार वाटण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

13:28 September 19

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा? याची चौकशी झाली पाहिजे - राज ठाकरे

नागपूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी वेदांता प्रकल्पासंदर्भात वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची Raj Thackeray demands inquiry into Vedanta project चौकशी करा. सत्य लोकांसमोर यायला हवे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

13:16 September 19

जिल्ह्यात एकूण पाच ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत असून तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचातीत काँग्रेसने बाजी मारली तर चांदुर रेल्वे तालुक्यात चांदूरवाडी येथे भाजपने बाजी मारली. धारणी तालुक्यात हरिसल येथे युवकांनी ग्रामपंचायत जिंकली असून अमरावती तालुक्यात रोहणखेडा आणि आखतखेडा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली आहे.

अमरावती - जिल्ह्यात एकूण पाच ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत असून तिवसा तालुक्यातील घोटा, कवडगव्हाण आणि उंबरखेड या तिन्ही ग्रामपंचातीत काँग्रेसने बाजी मारली तर चांदुर रेल्वे तालुक्यात चांदूरवाडी येथे भाजपने बाजी मारली. धारणी तालुक्यात हरिसल येथे युवकांनी ग्रामपंचायत जिंकली असून अमरावती तालुक्यात रोहणखेडा आणि आखतखेडा ग्रामपंचायत निवडणूक अविरोध झाली आहे.

12:54 September 19

कोल्हापूर निकाल

कोल्हापूर निकाल

पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हसन मुश्रीफ गटाच्या शितल अमोल नवाळे विजयी

समरजित घाटगे गटाच्या मंजू आनंदराव वाईगडे यांचा केला पराभव

जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी वर्चस्*

राष्ट्रवादीला अकरापैकी आठ जागा तर सरपंचही राष्ट्रवादीचा

भाजपचा पराभव

12:16 September 19

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा - नाशिक

एकुण ग्रामपंचायत- 82

शिवसेना - 2

शिंदे गट - ००

भाजप- 3

राष्ट्रवादी- 7

काँग्रेस- 1

माकप 1

इतर-1

12:04 September 19

अमरावती जिल्ह्यातील पाचही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

अमरावती जिल्ह्यातील पाचही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

अमरावती जिल्ह्यातील पाचही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

पाच ग्रामपंचायतमध्ये तीन काँग्रेस एक प्रहार व एका ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे विजयी

घोटा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या रुपाली राऊत विजयी

कवाडगव्हाणमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहीनी चौधरी विजयी

चांदूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी

हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये प्रहारचे विजय रामेश्वर दारशिंबे विजयी

11:40 September 19

नंदुरबार तालुक्यातील

नंदुरबार तालुक्यातील

शिरवाडे ग्रामपंचायत भाजप

रनाळे खूर्द अपक्ष

नागसेर भाजप सदस्य काँग्रेस निवडून आले

श्रीरामपूर भाजप

11:38 September 19

नंदुरबार ग्रामपंचायत

नंदुरबार ग्रामपंचायत

आतापर्यंत निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या - 40

भाजपा -18

शिंदे गट - 13

काँग्रेस - 04

राष्ट्रवादी -0

11:05 September 19

नंदुरबार तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे निकाल हाती

नंदुरबार तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत त्यापैकी पाचही निकाल भाजपाच्या बाजूने गेलेत

जिल्ह्यातील पहिला निकाल बालआमराई...

अजयपूर, बिलाडी आष्टे आंबापुर ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात

11:05 September 19

नंदुरबारमधील ग्रामपंचायत मोतमोजणीला सुरूवात

नंदुरबार तालुक्यातील घोगळगाव ग्रामपंचायत निकाल जाहीर; शिंदे गटाचा विजय

नंदुरबार तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायत भाजपकडे; आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे वर्चस्व

नंदुरबार तालुक्यातील धिरजगाव ग्रामपंचायत निकाल जाहीर; भाजप विजय

10:48 September 19

श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद प्रकरण ; आज सुनावणी

मथुरा : शाही इदगाह मशीद संकुलाजवळ बांधण्यात आलेल्या मीना मशिदीचे बांधकाम थांबवण्यासाठी दिनेश कौशिक यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागात नुकतीच याचिका दाखल केली (shahi idgah masjid sri krishna janmabhoomi dispute) होती. त्यावर आज सुनावणी होणार (case hearing today in Mathura) आहे.

10:47 September 19

राणीबागेला २ दिवसात १४ हजार पर्यटकांची भेट

मुंबई - मुंबईची राणीबाग ही पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन, वाघ, बिबट्या, अस्वल आदी प्राणी पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. सुट्टीच्या दिवशी या गर्दीत वाढ होते. शनिवार रविवार या दोन दिवसात तब्बल १४ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामधून राणीबागेला ५ लाख ७८ हजार ८५५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

10:47 September 19

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आज करणार भाजपमध्ये प्रवेश

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग ( Former Chief Minister of Punjab Amarinder Singh) आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की सिंह हे त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पीएलसी पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करतील. अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्ष सोडला आणि पीएलसीची स्थापना केली. आज दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP president JP Nadda in Delhi ) आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत.

09:40 September 19

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई - खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

09:39 September 19

कला अंगात नसल्याने आताचे लावणी कलाकार अंगविक्षेप करतात - सुरेखा पुणेकर

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सव हे निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंधमुक्त करण्यात आल्याने सर्व सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लावणीचे देखील सध्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असून सध्या लावणीचं स्वरूप हे बदलत आहे.सध्या जे नवनवीन कलाकारांच्या माध्यमातून लावणी सादर केली जात आहे. यात कमी कपडे, प्रेक्षकांकडे बघून वेगवेळ्या प्रकारचे हावभाव करणे हे सध्या लावणी कलाकारांच्या माध्यमातून सुरू आहे. यावर ज्येष्ठ लावणी कलाकार,तसेच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

09:38 September 19

विनायक राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील विधानावर शितल म्हात्रे यांची प्रतिक्रिया

मुंबई - खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अशा भाषेत बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक पातळी दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले.

09:38 September 19

सातारा शिवसैनिकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिले महाराष्ट्र दौऱ्याचे संकेत

सातारा : उद्धव ठाकरे यांनी रविवारी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांशी मातोश्रीवर संवाद साधला. दसरा मेळाव्यानंतर आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे संकेत ( Uddhav Thackeray Visit Tour of Maharashtra ) त्यांनी दिले असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या गाठीभेटींवर ( Uddhav Thackeray Interacted with Shiv Sainiks ) जोर दिला आहे. रविवारी सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला. दसरा मेळाव्यानंतर आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी ( Uddhav Thackeray Meeting with Shiv Sainiks at Matoshree ) दिली.

08:09 September 19

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार

राणी एलिझाबेथ द्वितीय अंत्यसंस्कार : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार ( Queen Elizabeth II funeral ) करण्यात येणार आहेत. यादरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगातील विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रतिनिधी लंडनला पोहोचले आहेत. रविवारीच राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक जमले होते. आज ही गर्दी आणखी वाढू शकते.

08:08 September 19

पुण्यात शिवशाही बसची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू, सात जण जखमी

पुणे - उरुळी देवाची हद्दीत हडपसर - सासवड येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. एका कंटेनर आणि शिवशाही बस यांमध्ये जोरदार धडक होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

08:08 September 19

किनवट तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान; आज मतमोजणी

नांदेड - सर्वांचे लक्ष लागून असलेल्या किनवट तालुक्यातील रविवारी संपन्न झालेल्या ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ७० टक्यापर्यंत मतदान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. किनवट तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याचे तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी सांगितले. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

06:57 September 19

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किमती ( Petrol Diesel Rate Today ) ह्या सर्वसामान्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिल्या आहेत. बाजारातील जीवनावश्यक वस्तूंचे दरही पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर कमी-जास्त होत असतात. महागाईमधील चढ-उतार मोठ्या प्रमाणात त्यावरच ठरतो. त्यामुळेच इंधन दरांकडे ( Petrol Diesel Rate ) नागरिकांचे लक्ष ( Today Maharashtra Petrol Diesel Rate ) असते. जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol Diesel Rate 19 September 2022 ) काय आहेत.

06:57 September 19

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयातून जामीन

मुंबई - जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून दिल्या प्रकरणात 15 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही असे हमीपत्र देण्यासही न्यायालयाने आरोपी बिष्णू भौमिकच्या कुटुंबीयांना सांगितले आहे.

06:56 September 19

राज ठाकरेंकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे जाहीर कौतूक

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर शहराचे वाढलेलं वैभव आणि इतिहास अनुभवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूरच्या फुटाळा तलाव येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन आणि 'लेझर शो' बघण्यासाठी हजेरी लावली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप आणि मनसेचे अनेक नेते उपस्थित होते. सुमधुर गीतांवर नाचणारे पाणी आणि कारंजे बघून राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

06:33 September 19

सोलापुरातील वकिलाच्या हत्या प्रकरणातील वकील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

मुंबई - सोलापूरमधील एका वकिलाने दुसऱ्या वकिलाची हत्या करून सोन्याचे दागिने लंपास केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी वकील सुरेश चव्हाणला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 2019 मध्ये या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपीचा जामीन अर्ज यापूर्वी सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

06:11 September 19

Maharashtra Gram Panchayat Election Result : ETV भारतचे लाईव्ह पेज वाचा

रत्नागिरी - आमचे उद्धवजी राष्ट्रवादीची भांडी घासताहेत, जे शिवसेनाप्रमुखांनी कमावलं ते उद्धवजींनी गमावलं अशी टीका शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. ते दापोलीतील मेळाव्यात बोलत होते. तसेच लग्न करून बघ, मग समजेल संसार काय असतो ते अशीही टीका रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर यावेळी केली.

Last Updated :Sep 19, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.