ETV Bharat / bharat

Place Marathi boards on shops : दुकांनावर मराठी पाटी नसेल तर होणार कारवाई, जाणून घ्या काय आहेत नियम

author img

By

Published : Oct 7, 2022, 2:09 PM IST

Place Marathi boards on shops
दुकांनावर मराठी पाटी नसेल तर होणार कारवाई

मुंबई - राज्य सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा ( Place Marathi boards on shops ) निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीत दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहे. तीन वेळा संधी देऊनही बहुसंख्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. यामुळे येत्या सोमवारपासून दुकानांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांना ७ दिवसांचा वेळ दिला गेला आहे. त्यानंतरही मराठी नावे न लावल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

मुंबई : राज्य सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा (Place Marathi boards on shops )निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीत दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहे. तीन वेळा संधी देऊनही बहुसंख्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. यामुळे येत्या सोमवारपासून दुकानांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांना ७ दिवसांचा वेळ देऊन त्यानंतरही मराठी नावे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.

मराठी पाट्यांचं प्रमाण कमी - मुंबईत सुमारे ५ लाख दुकाने आहेत.( 5 lac shop in mumbai ) तरी देखील बहुसंख्य ठिकाणी मराठी पाट्याच नाही. मुंबईत मराठी पाट्या लावण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी पालिकेने ३१ मे, ३० जून व ३० सप्टेंबर अशी तीन वेळा डेडलाईन दिली होती. या कालावधीत २ लाख दुकानांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी केवळ १ लाख दुकानांनी मराठी पाट्या लावल्या होत्या. सर्व्हे केल्या प्रमाणे २ लाखांपैकी १ लाख म्हणजे ५० टक्के दुकानांनी मराठी पाट्या लावल्या आहेत. ३ ऑक्टोबरपासून वॉर्डनिहाय तपासणी करून दुकानांवर मराठी पाट्या न दिसल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असे सांगण्यात आले होते. पालिकेत सोमवार व मंगळवार रोजी याबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी दसरा असल्याने कारवाई करण्यात आली नव्हती. या दरम्यान पालिकेकडून कोणती कारवाई करावी याचा निर्णय घेण्यात आला नव्हता.



अशी होणार कारवाई - आता येत्या सोमवारपासून म्हणजेच १० ऑक्टोबरपासून सर्व दुकानांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीत ज्या दुकानांवर मराठी पाट्या दिसणार नाहीत त्यांना ७ दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे. त्या नंतरही जे दुकानदार मराठी पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानातील प्रत्येक कामगारामागे दोन हजार किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार दंड वसूल केला जाऊ शकतो अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त संजोग कबरे ( Municipal Deputy Commissioner Sanjog Kabare ) यांनी दिली.

काय आहे नियम - २०१८ च्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता नाम फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात मद्यविक्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत.

तीन वेळा मुदतवाढ - राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा प्रकारे लावण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने दुकानदारांना ३१ मे ची डेडलाईन दिली होती. व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे, मटेरिअल महागले आहे असे सांगत अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ३० जून पर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या न लावता सहा महिन्याची मुदत वाढ मागितली. त्यावर आयुक्तांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.