BJP Founding Day : भाजप श्रेष्ठ भारताचा संकल्प बळकट करत आहे -पंतप्रधान

author img

By

Published : Apr 6, 2022, 3:09 PM IST

Updated : Apr 6, 2022, 3:17 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्ते, मंत्री, खासदार आणि आमदारांना संबोधित केले आहे. यावेळी मोदी म्हणाले, 'मी देशभरात आणि जगभरात पसरलेल्या भाजपच्या प्रत्येक सदस्याला माझ्या शुभेच्छा देतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कोहिमापर्यंत भाजप एक भारत, श्रेष्ठ भारताचा संकल्प सातत्याने बळकट करत आहे अस पंतप्रधान म्हणाले आहेत.

नवी दिल्ली - पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्ते, मंत्री, खासदार आणि आमदारांना संबोधित केले आहे. यावेळी मोदी म्हणाले, 'मी देशभरात आणि जगभरात पसरलेल्या भाजपच्या प्रत्येक सदस्याला माझ्या शुभेच्छा देतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कोहिमापर्यंत भाजप एक भारत, श्रेष्ठ भारताचा संकल्प सातत्याने बळकट करत आहे. आज नवरात्रीची पाचवी तिथीही आहे, या दिवशी आपण सर्वजण स्कंदमातेची पूजा करतो. आपण सर्वांनी पाहिले आहे, की स्कंदमाता कमळाच्या आसनावर बसलेली आहे आणि तिच्या दोन्ही हातात कमळाचे फूल आहे.

राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या 100 वर - पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'सरकार राष्ट्रीय हिताला सर्वोच्च ठेवून काम करत आहे. सरकारी यंत्रणेचे फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विशेषत: भाजप कार्यकर्त्यांना, मोदी म्हणाले, की देशाच्या संकल्पाला चिकटून राहावे लागेल. 'तीन दशकांनंतर राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या 100 वर पोहोचली आहे.

भाजप कार्यकर्त्यांसाठी कर्तव्याचा काळ - जागतिक दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय दृष्टिकोनातून भाजपच्या जबाबदारीकडे बघा, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी सातत्याने वाढत आहे. या अमृत काळात, भारताचा विचार स्वावलंबनाचा आहे, स्थानिक जागतिक, सामाजिक न्याय आणि सुसंवाद साधण्याचा आहे. या ठरावांच्या बळावर आपल्या पक्षाची स्थापना विचाराचे बीज म्हणून झाली. त्यामुळे हा अमृत काल हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांसाठी कर्तव्याचा काळ आहे.

देशाला सामर्थ्याकडे नेत आहोत - भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यक्रमात सांगितले, की आज भाजपचा (42)वा स्थापना दिवस आहे. आपल्या सर्वांसाठी हा खूप आनंदाचा प्रसंग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आमच्या कोट्यावधी कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देवो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. जेणेकरुन आपण समाजात जो बदल घडवून आणत आहोत, देशाला सामर्थ्याकडे नेत आहोत, त्यात आपल्याला बळ मिळेल आणि आपण ते योग्य प्रकारे पूर्ण करू शकू असही ते म्हणाले आहेत.

लोककल्याणकारी योजनांबाबत जनजागृती - पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष 7 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान देशभरात सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर कार्यक्रम आयोजित करेल. ते म्हणाले की, या मोहिमेदरम्यान पक्षाचे कार्यकर्ते मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करतील. सिंह म्हणाले की, 14 एप्रिल रोजी बीआर आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या मोहिमेदरम्यान कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

हेही वाचा - Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. चर्चांना उधाण

Last Updated :Apr 6, 2022, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.