ETV Bharat / bharat

Big Breaking : मुंबई - एनसीबीचा क्रुझवर छापा १० जण घेतले ताब्यात

author img

By

Published : Oct 2, 2021, 7:49 AM IST

Updated : Oct 2, 2021, 10:28 PM IST

big Breaking Update in india
big Breaking Update in india

22:27 October 02

मुंबई - एनसीबीचा क्रुझवर छापा १० जण घेतले ताब्यात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मुंबईतील क्रूझवर आयोजित केलेल्या पार्टीवर छापा टाकला

या छाप्यादरम्यान किमान 10 जणांना ताब्यात घेतले.

20:30 October 02

शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने मिळणार पीक कर्ज - अजित पवार

शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने मिळणार पीक कर्ज - अजित पवार

बारामती- आगामी काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल कसे निवडून आणता येईल. याबाबत तेराही तालुक्यातील प्रमुख एकत्रित बसून चांगल्या प्रकारचा मार्ग काढू. जसे की, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज होते. ते आता पाच लाखापर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

19:14 October 02

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन झाले आहे.

मिरासदार यांचे निधन पुण्यात झाले.

17:59 October 02

संरक्षणाशिवाय विजेची थकबाकी वसूल करण्यास कामगारांचा नकार, आंदोलन करणार

कोल्हापूर ब्रेकिंग -

संरक्षणाशिवाय विजेची थकबाकी वसूल करण्यास कामगारांचा नकार

12 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर राज्यव्यापी आंदोलनात उतरणार

32 हजार कामगारांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी

70 हजार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी होत असलेल्या दबावाला कामगारांचा विरोध

मुंबईत प्रकाशगड कार्यालयासमोर करणार आंदोलन

अध्यक्ष मोहन शर्मा यांची कोल्हापुरात आंदोलनाची घोषणा

17:27 October 02

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सेवाग्राम आश्रमाला भेट, गांधीजींना अभिवादन

वर्धा

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सेवाग्राम आश्रमाला भेट

- आश्रमात केले गांधीजींना अभिवादन

- महात्मा गांधींच्या आश्रमात प्रार्थना करत केले अभिवादन

- महात्मा गांधी हे देशाचे आणि जगाचे सत्य शांती आणि अहिंसेचे प्रेरक राहिले आहेत

- ते आदर्श आणि त्यागमय जीवन जगले आणि असे जीवन जगून त्यांनी शेकडो हजारो लोकांना प्रेरित केले

- आज गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहेत, जेवढा कालावधी उलटत आहे, तेवढे त्यांना आठवले जात आहे

- आज महात्मा गांधींची जयंती आहे. मला वाटले की आपण सेवाग्रामचे दर्शन केले पाहिजे आणि इथे येऊन धन्य झालो आहे - राज्यपाल

17:23 October 02

नाना पटोले यांचे संजय राऊत यांना प्रतिउत्तर

Nagpur Flash:-

काँग्रेस पक्षामध्ये काय चांगलं करायचं आहे, हे काँग्रेसला माहीत आहे,नाना पटोलेंचे संजय राऊत यांना प्रतिउत्तर

नेतृत्व नसलेल्या काँग्रेसचा भारतीय जनता पक्ष फायदा घेत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

पटोले नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

16:31 October 02

भुजबळ-कांदे वाद प्रकरण, अक्षय निकाळजे गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल

नाशिक ब्रेकिंग :-

- भुजबळ-कांदे वाद प्रकरण

- अक्षय निकाळजे यांनी धमकी दिल्याची कांदे यांची तक्रार

- पोलिसांनी अक्षय निकाळजे यांना हजर राहण्यासाठी बजावले होते समन्स

- अक्षय निकाळजे नाशकात दाखल

- गंगापूर पोलीस ठाण्यात दिली हजेरी

- पोलीस नोंदवणार, निकाळजे यांचा जबाब

- अक्षय निकाळजे हा छोटा राजनचा पुतण्या

- जवळपास 50 गाड्यांचा ताफा

- समर्थकांची मोठी गर्दी

- शिवसेना आमदार सुहास कांदे यांनाही पोलिसांचे समन्स

- आमदार कांदे यांचाही नोंदवला जाणार जबाब

- अक्षय निकाळजे आणि सुहास कांदे या दोघांकडेही पोलीस मागणार कॉल रेकॉर्डिंग

- मात्र, 5 ऑक्टोबरपर्यंत व्यग्र असल्याचा,आमदार कांदे यांचा पोलिसांना निरोप

- 6 ऑक्टोबरला, कांदे यांचा नोंदवला जाणार जबाब

16:12 October 02

के-9 वज्रा हॉविट्झर्सची यशस्वी चाचणी

भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील अत्यंत उंचीच्या ठिकाणी के-9 वज्रा हॉविट्झर्सची यशस्वी चाचणी केली आहे.

सेक्टरमध्ये या तोफांच्या रेजिमेंटचा समावेश केला आहे.

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ही माहिती दिली.

16:06 October 02

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

नागपूर:-

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत.

त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन यावर्षी करता येणार नाही.

आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

16:01 October 02

दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय

शारजाः दिल्ली कॅपिटल्स (डीसी) ने शनिवारी नाणेफेक जिंकली.

 गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय.

मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्ध शारजाह क्रिकेट स्टेडियमवर ब्लॉकबस्टर लढत होऊ शक्यता

15:56 October 02

शेताची पाहणी करणाऱ्या फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्याने मारली शेतातील पाण्यात डुबकी

वाशिम :

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकऱ्याने शेतात साचलेल्या पाण्यात मारली डुबकी

देवेंद्र फडणवीस मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथे पीक नुकसानाची पाहणी करीत होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने शेतात साचलेल्या पाण्यात डुबकी मारत मदत करण्याची मागणी केली.

15:31 October 02

औरंगाबाद घाटी रुग्णालयातील मार्ड डॉक्टरांचा संप कायम

औरंगाबाद ब्रेकिंग :-

औरंगाबाद घाटी रुग्णालयातील मार्ड डॉक्टरांचा संप कायम.

तब्बल 100 ते 150 डॉक्टरांचा सहभाग.

मार्ड डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागणी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.

डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा सोडता बाकी काम ठेवले बंद.

रुग्णसेवेवर संपाचा मोठा परिणाम.

10:27 October 02

काँग्रेसला अध्यक्ष नसणं चांगली गोष्ट नाही - संजय राऊत

कोणताही पक्ष असेल त्याला नेतृत्व पक्षाध्यक्ष हवाच. तेव्हा तो पक्ष काम करू शकतो. काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस पक्षाचे मोलाचं सहकार्य आहे. असं असताना गेल्या काही वर्षापासून काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं ही चांगली गोष्ट नाही आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी घेत आहे. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात असं संजय राऊत म्हणाले.

07:54 October 02

  • नागपूर : केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी यांच्या घराजवळ एका व्यक्तीने आत्मदहन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यक्तीचे नाव विजय मारोतराव पवार (55) असून तो बु़लडाणा येथील रहिवासी आहे. पंढरपूर ते शेगाव पालखी मार्गाचे रुंदीकरणासह सिमेंट रस्त्याचा दर्जा सुधारणे तसेच रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याचे काम गणेश विसर्जनानंतर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनातर्फे त्याला देण्यात आले होते. परंतु गणेश विसर्जनानंतर सुद्धा त्याबाबत पुर्तता झाली नसल्याने प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

07:16 October 02

big Breaking

  • देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
Last Updated :Oct 2, 2021, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.