ETV Bharat / bharat

MP Bhind Boat Drowned : भंडारा खाऊन परताना सिंध नदीत बोट बुडाली; 2 चिमुकले बेपत्ता, बोटीत होते 12 जण

author img

By

Published : Jan 29, 2022, 11:38 AM IST

Updated : Jan 29, 2022, 1:28 PM IST

MP Bhind Boat Drowned
सिंध नदीत बोट बुडाली

मध्य प्रदेशातल्या ( MP Bhind Boat Drowned ) सिंध नदीत मोठी दुर्घटना घडली आहे. भिंड जिल्ह्यात असलेल्या सिंध नदीत ( Boat Drowned in Sindh River ) हिलगाव गावातील गावकऱ्यांनी भरलेली बोट बुडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडली तेव्हा बोटीत जवळपास 12 जण होते. त्यापैकी 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 2 चिमुकले अद्याप बेपत्ता आहेत.

भिंड (मध्यप्रदेश) - मध्य प्रदेशातल्या ( MP Bhind Boat Drowned ) सिंध नदीत मोठी दुर्घटना घडली आहे. भिंड जिल्ह्यात असलेल्या सिंध नदीत ( Boat Drowned in Sindh River ) हिलगाव गावातील गावकऱ्यांनी भरलेली बोट बुडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडली तेव्हा बोटीत जवळपास 12 जण होते. त्यापैकी 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 2 चिमुकले अद्याप बेपत्ता आहेत.

सिंध नदीत बोट बुडाली

गावकऱ्यांनी 10 जणांचे वाचवले प्राण -

भिंडच्या नयागाव पोलीस स्टेशन हद्दीतील तेहंगूर येथील हिलगाव गावातील काही लोक भंडारा खाण्यासाठी आले होते. भंडारा खाऊन परतत असताना सिंध नदीत त्यांची बोट उलटली. अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 12 जण बसले होते. त्यापैकी 10 जणांची गावकऱ्यांनी वाचले आहे असे एएसपी कमलेश कुमार यांनी सांगितले. दोन मुले अद्याप बेपत्ता असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन मुले बेपत्ता -

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील द्रौपती सुखडी बघेल (वय 16, रौन) आणि ओम सुभाष बघेल (वय 13, मिर्झापूर, उत्तरप्रदेश) हे दोघेही त्यांच्या सोबत होते. ते दोघेही अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

शोध मोहीम सुरूच -

माहिती मिळताच एएसपी कमलेश कुमार यांच्यासह एसडीएम आणि इतर अधिकारी आणि होमगार्ड/एसडीआरएफची टीमही पोहोचली आहे. सध्या त्यादोघांचाही शोध सुरूच आहे. मात्र, अंधारामुळे शोध घेणे अवघड झाले होते.

हेही वाचा - Puri Express Catch Fire : गांधीधाम पुरी एक्सप्रेसला नंदुरबार स्थानकाजवळ आग

Last Updated :Jan 29, 2022, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.