ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

author img

By

Published : Feb 5, 2020, 4:36 PM IST

Updated : Feb 5, 2020, 8:25 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर उभारण्यास मंजूरी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची नवीन वाढवण बंदराला मंजूरी
केंद्रीय मंत्रिमंडळाची नवीन वाढवण बंदराला मंजूरी

नवी दिल्ली - डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर उभारण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाढवण बंदराला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी इतका असल्याची माहिती आहे. लँड लार्ड मॉडेलच्या धर्तीवर वाढवण बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

महाराष्ट्रातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

डहाणू तालुक्यात वाढवणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर बांधण्याचा शासनाचा प्रयत्न असून या बंदराला स्थानिक मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांचा तीव्र विरोध आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर तसेच जगातील सर्वोत्कृष्ट 10 बंदर ठरेल अशी या बंदराची रचना आहे. सदर बंदर बनवण्यासाठी 22 मीटर खोल समुद्रामध्ये 5000 एकराचा भराव करावा लागणार आहे. मात्र, यामुळे या परिसरातील जैवविविधता व मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार असल्यामुळे वाढवण बंदराला ग्रामस्थांचा आणि मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे.

1995 मध्ये या बंदर उभारणीचा प्रस्ताव प्रथम मांडण्यात आला होता. त्याप्रसंगी स्थानिकांकडून झालेल्या विरोधाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेऊन उद्धव ठाकरे यांना लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा रेटून नेण्याचा घाट बांधला.या प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध पाहून 2016 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत, मे 2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत तसेच 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आपण जनतेसोबत राहु" असे जाहीर आश्वासन प्रचारसभेमध्ये दिले होते. आज केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदराला मंजुरी दिल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:



 



 केंद्रीय मंत्रिमंडळाची नवीन वाढवण बंदराला मंजूरी

नवी दिल्ली -   डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदराचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्राच्या पालघर जिह्यातील वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर उभारण्यास मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाढवण बंदराला मंजूरी देत असल्याची घोषणा केली.  प्रकल्पाचा एकून खर्च  65,544.54 कोटी एवढी असल्याची माहिती आहे.  लँड लार्ड मॉडेलच्या धर्तीवर वाढवण बंदर विकसीत करण्याचा प्रस्ताव आहे.

डहाणू तालुक्यात वाढवणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी बंदर बांधण्याचा शासनाचा प्रयत्न असून या बंदराला स्थानिक मच्छीमार, शेतकरी व भूमिपुत्रांचा तीव्र विरोध आहे. वाढवण बंदर हे आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर तसेच जगातील सर्वोत्कृष्ट 10 बंदर ठरेल अशी या बंदाराची रचना आहे. सदर बंदर बनवण्यासाठी 22 मीटर खोल समुद्रामध्ये 5000 एकराचा भराव करावा लागणार आहे. मात्र, यामुळे या परिसरातील जैवविविधता व मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. तसेच स्थानिकांच्या जमिनी देखील घेतल्या जाणार असल्यामुळे वाढवण बंदराला ग्रामस्थांचा आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे.

1995 मध्ये या बंदर उभारणीचा प्रस्ताव प्रथम मांडण्यात आला होता. त्याप्रसंगी स्थानिकांकडून झालेल्या विरोधाची दखल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेऊन उद्धव ठाकरे यांना लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा रेटून नेण्याचा घाट बांधला.

या प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध पाहून 2016 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत, मे 2018 च्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत तसेच 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आपण जनतेसोबत राहु" असे जाहीर आश्वासन प्रचारसभेमध्ये दिले होते. आज  केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदराला मंजूरी दिल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




Conclusion:
Last Updated : Feb 5, 2020, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.