ETV Bharat / bharat

'नवीन शिक्षण धोरणात खेळ हा अभ्यासक्रमाचा भाग असेल'

author img

By

Published : Jun 11, 2020, 11:00 PM IST

“खेळ देखील एक शिक्षण आहे, त्यामुळे खेळ अतिरिक्त-पाठ्यक्रमात्मक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. म्हणून, प्रत्येकाने खेळाचा शिक्षणाचा एक भाग म्हणून खेळाचा स्विकार करावा" असे किरेन रिजिजू म्हणाले.

Kiren Rijiju
किरेन रिजिजू

नवी दिल्ली - देशात नवीन शिक्षण धोरणानुसार आखण्यात आलेल्या नियमावलीत खेळ हा अभ्यासक्रमाचा भाग असेल. फक्त अतिरिक्त क्रिया म्हणून तो मानला जाणार नाही, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले. गुरुवारी एकविसाव्या शतकातील 'ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक शिक्षणावरील आंतरराष्ट्रीय वेबिनार'च्या उद्घाटन सत्रात रिजिजू बोलत होते.

"भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्रीडादेखील शिक्षणाचा एक भाग आहे." त्यामुळे खेळाला अतिरिक्त अभ्यासक्रमाचा भागात समाविष्ट न करता शैक्षणिक विषयात याचा समावेश केला जाईल, असे ते म्हणाले. एक शिक्षण आहे, एक खेळ आहे, मात्र हे दोघे एकसारखेच आहेत, असा माझा नेहमीच विश्वास आहे. तसेच, खेळाला पर्यायी विषय मानले जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

“खेळ देखील एक शिक्षण आहे, त्यामुळे खेळ अतिरिक्त-पाठ्यक्रमात्मक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. म्हणून, खेळाला अतिरिक्त विषय मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे, प्रत्येकाने खेळाचा शिक्षणाचा एक भाग म्हणून खेळाचा स्विकार करावा" असेही ते म्हणाले.

सध्या शिक्षणाच्या नव्या नियमावलीनुसार याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, ते अंतिम टप्यात आहे. माझ्या मंत्रालयाने याबाबात पूर्ण शैक्षणिक धोरणाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु, ते जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. खेळ आणि शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून खेळाला समाविष्ट करण्याकरता मी आणि माझ्या आमच्या मंत्रालयाने यापूर्वी राष्ट्रीय समितीत जोरदारपणे भूमिका मांडली आहे " असे रिजीजू म्हणाले.

तसेच "आम्ही आमच्या राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळाची घोषणा आधीच केली असून याबद्दल मला खूप आनंद आहे. याची प्रक्रिया ही निर्मितीच्या टप्प्यात असून त्याकरता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, ही समिती राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळात कशी आणता येईल, याबद्दल चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.