नवी दिल्ली - सिमी या दहशतवादी संघटनेच्या २ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या संयुक्त छाप्यात या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 'इलियास' नावाच्या आतंकवाद्यास दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर मुंबई एटीएसच्या पथकाने त्यांना 3 दिवसांच्या ट्रांजिट रिमांडवर मुंबईला नेले आहे.
हेही वाचा... मंत्रालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
प्राप्त माहितीनुसार, अटक केलेला दहशतवादी हा इंडियन मुजाहिद्दीनचा नेता अब्दुल सुभान कुरेशी याचा नातेवाईक आहे. दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशीला 2018 मध्ये अटक केली होती. दहशतवादी इलियास हा सुमारे 18 वर्षांपासून फरार होता, असे सांगितले जात आहे. तसेच इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या अब्दुल सुभान कुरेशी याचा तो नातेवाईक आहे.
हेही वाचा... महागाई-मंदीवर प्रश्न विचारताच निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'नो कॉमेंट'
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबई एटीएसच्या पथकाने मुंबईला नेले आहे. एटीएसची टीम मुंबई येथे पुढील चौकशी करणार आहे.