ETV Bharat / bharat

शिल्पा शेट्टीच्या पतीची साडेनऊ तास 'ईडी'कडून चौकशी

author img

By

Published : Oct 31, 2019, 10:22 AM IST

शिल्पा शेट्टीच्या पतीची साडेनऊ तास ईडी चौकशी

इक्बाल मिर्ची प्रकरणात याआधी अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपीच्या जबानीतून कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. कुंद्रा याचे इक्बालसोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे.

मुंबई - दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा यांची ईडीने बुधवारी तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. त्यांना काही दिवसांपूर्वी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. यानुसार, कुंद्रा यांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मुदत संपण्याआधीच कुंद्रा ईडी कार्यालयात हजर झाले.

इक्बाल मिर्ची प्रकरणात याआधी अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपीच्या जबानीतून कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. कुंद्रा याचे इक्बालसोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. 2011 मध्ये आर. के. डब्ल्यू नावाची कंपनी कुंद्रा यांनी विकत घेतली होती. याबरोबरच मुंबईतील विमानतळाजवळ एक भूखंडही कुंद्रा यांनी खरेदी केला होता. मात्र, या प्रकरणात आपले इक्बालसोबत कुठलेही संबंध नव्हते, असे म्हणत कुंद्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ईडीकडून अटक करण्यात आलेल्या रणजीत बिंद्रा या आरोपीने इक्बालच्या जवळपास 225 कोटी रुपयांच्या संपत्तीचा व्यवहार घडवून आणला होता. यात कुंद्रा यांच्यासोबतही व्यवहार झाल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. कुंद्रा यांची इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी ही कंपनी असून याच्या संचालक पदावर त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी आहे. या कंपनीमध्ये बिंद्रा यानेही काही पैसे गुंतवले असल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Intro:दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक इक्बाल मिर्ची प्रकरणांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याची तब्बल साडे नऊ तास ईडीने बुधवारी चौकशी केली . काही दिवसांपूर्वी ईडी कडून बजावण्यात आलेल्या समन्स द्वारे 4 नोव्हेंबर पर्यंत राज कुंद्रा याला कार्यालयासह चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र त्या आगोदरच राज कुंद्रा हा बुधवारी ईडी कार्यालयात हजर झाला .।


इक्बाल मिर्ची प्रकरणात या अगोदर अटक करण्यात आलेल्या रणजीत सिंग बिंद्रा या आरोपींच्या जबाणीतून राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. राज कुंद्रा याचे इक्बाल मिर्ची सोबत संबंध असल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. 2011मध्ये आरकेडब्ल्यू नावाची कंपनी राज कुंद्रा यांनी विकत घेतली होती. याबरोबरच मुंबईतील विमानतळ जवळ एक जमीन सुद्धा राज कुंद्रा यांनी विकत घेतली होती. मात्र या प्रकरणात आपले इकबाल मिर्ची सोबत कुठलेही संबंध नव्हते अस म्हणत राज कुंद्रा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Body:ईडी कडून अटक करण्यात आलेल्या रणजीत बिंद्रा या आरोपीने इक्बाल मिर्चीची जवळपास 225 कोटी रुपयांची संपत्ती चा व्यवहार घडवून आणला होता. यात राज कुंद्रा यांच्या सोबतही व्यवहार झाल्याचा ईडी अधिकाऱ्यांना संशय आहे. राज कुंद्रा याची इसेनशीयल हॉस्पिटालिटी ही कंपनी असून याच्या संचालक पदावर त्याची पत्नी शिल्पा शेट्टी आहे . या कंपनीमध्ये रंजीत बिंद्रा यांनी काही पैसे गुंतवले असल्याच ईडी अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.