ETV Bharat / bharat

दलित महिला अत्याचार : राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर

author img

By

Published : Oct 3, 2020, 10:23 PM IST

राजस्थान सरकार आणि पोलीस दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात अलर्ट झाले आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सुचनेनुसार राजस्थानमधील सर्व पोलीस अधीक्षक अॅट्रोसिटी प्रकरणी नोंद झालेल्या तक्रारीसंदर्भात स्वत: लक्ष घालत आहेत. अशा प्रकरणात पोलिसांकडून तक्रारी व्यवस्थितरित्या नोंद होत नसल्याने आरोपी दलितांवर अत्याचार करण्याचे धाडस करत आहेत.

Rajasthan ranks second in crimes against Dalits
दलित महिला अत्याचार : राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर

जयपूर - देशात सन २०१९ या वर्षात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार दलित महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या एकूण 45,935 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात एकट्या राजस्थानमध्ये 6,794 गुन्हे नोंद झाले आहेत. याची टक्केवारी एकूण गुन्ह्याच्या १४.८० टक्के इतकी आहे. यामुळे राजस्थान दलितांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या गुन्हे नोंद होण्याच्या यादीत देशात दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. मागील तीन वर्षाची आकडेवारी पाहता दरवर्षी दलितांवर होणारे अत्याचाराच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे.

दलित महिला अत्याचार : राजस्थान देशात दुसऱ्या क्रमांकावर

याविषयी राजस्थानचे एडीजी म्हणाले, की राजस्थान सरकार आणि पोलीस दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात अलर्ट झाले आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सुचनेनुसार राजस्थानमधील सर्व पोलीस अधीक्षक अॅट्रोसिटी प्रकरणी नोंद झालेल्या तक्रारीसंदर्भात स्वत: लक्ष घालत आहेत. अशा प्रकरणात पोलिसांकडून तक्रारी व्यवस्थितरित्या नोंद होत नसल्याने आरोपी दलितांवर अत्याचार करण्याचे धाडस करत आहेत.

पुढे ते म्हणाले, की मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यातील टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासंदर्भात त्यांना विशेष सुचना दिल्या आहेत. तसेच जानेवारी २०२० पासून ते ऑगस्टपर्यंत 3498 बलात्कारच्या गुन्हे राज्यात नोंद झाले आहेत. यातील 42.87 टक्के हे गुन्हे बनावट असल्याचे तपासात व न्यायालयात निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे 1,930 तक्रारी राज्यात दाखल झाले आहेत. यातील २५ टक्के तक्रारी बनावट असल्याचे समोर आले आहे.

दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

मागील तीन वर्षात देशात दलितांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. २०१७ मद्ये देशात 43,203 तक्रारी दाखल झाले आहेत. यापैकी राजस्थानमध्ये 4,238 तक्रारी नोंद झाल्या आहेत. सन 2018 मध्ये देशात 42, 793 तक्ररी दाखल झाल्या आहेत. तर राजस्थानमद्ये 4,607 तक्रारी नोंद झाल्या आहेत. सन 2019मध्ये देशात 45,935 793 तक्ररी दाखल झाल्या आहेत. तर राजस्थानमद्ये 793 तक्ररी दाखल झाल्या आहेत. तर राजस्थानमद्ये ४५०६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.