ETV Bharat / bharat

'शाहीन बाग, जामियामधील सीएएविरोधी आंदोलन योगायोग नसून एक प्रयोग'

author img

By

Published : Feb 3, 2020, 7:25 PM IST

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीच्या कडकडडुमामध्ये प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर जोरादार हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीच्या कडकडडुमामध्ये प्रचार सभेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर जोरदार हल्ला चढवला. सीलमपूर, शाहीन बाग आणि जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन हा एक प्रयोग आहे. जो आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.

  • #WATCH PM Modi: Be it Seelampur, Jamia or Shaheen Bagh, protests held over the past several days regarding the Citizenship Amendment Bill. Is this just a coincidence? No. This is an experiment.There is a political design behind this which has plans to destroy harmony in country pic.twitter.com/HBkBem6Spk

    — ANI (@ANI) February 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
सीलमपूर, शाहीन बाग आणि जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन हा एक योगायोग नसून प्रयोग आहे. जर ते कायद्याचा विरोध करत असते. तर सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवे होते. मात्र, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस लोकांना भडवकवत असून राजकारणाचा खेळ खेळत असून देशातील सुसंवाद नष्ट करण्याचा हा डाव आहे, अशी टीका मोदी यांनी केली.केजरीवाला यांनी दिल्लीकरांचा विकास केला नसून फक्त राजकारण केले आहे. त्यांनी गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांध्ये जी आश्वासन दिली होती. ती त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवरून जूना जाहिरनामा हटवला आहे. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले. तसेच यश या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. केजरीवाल सरकारने दिल्लीतील मध्यमवर्गीय आणि गरीबांकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच त्यांनी दिल्लीकरांच्या आरोग्याकडी दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल यांनी केंद्राच्या योजनांमध्ये अडथळे आणले. प्रधानमंत्री आवास योजना व आयुष्मान भारत यांची केजरीवाल यांनी अंमलबजावणी केली नाही. राजकारण माणुसकीपेक्षा मोठं झालं आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच कल्याणकारी कामे करण्यापेक्षा ते चांगल्या कामात अडथळाच निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे दिल्लीकर यावेळी त्यांना धडा शिकवतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

दरम्यान येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Intro:Body:





नवी दिल्ली -   दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीच्या कडकडडुमामध्ये प्रचार सभेला संबोधीत केले. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर जोरादार हल्ला चढवला.  सीलमपूर, शाहीन बाग आणि जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन हा एक प्रयोग आहे. जो आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.

सीलमपूर, शाहीन बाग आणि जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन हा एक योगायोग नसून प्रयोग आहे. जर ते कायद्याचा विरोध करत असते. तर सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवे होते. मात्र, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस लोकांना भडवकवत असून राजकारणाचा खेळ खेळत असून देशातील सुसंवाद नष्ट करण्याचा हा डाव आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

केजरीवाला यांनी दिल्लीकरांचा विकास केला नसून फक्त राजकारण केले आहे. त्यांनी गेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांध्ये जी आश्वासन दिली होती. ती त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवरून जूना जाहिरनामा हटवला आहे. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले. तसेच यश या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.  

केजरीवाल सरकारने दिल्लीतील मध्यमवर्गीय आणि गरीबांकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच त्यांनी दिल्लीकरांच्या आरोग्याकडी दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल यांनी केंद्राच्या योजनांमध्ये अडथळे आणले. प्रधानमंत्री आवास योजना व आयुष्मान भारत यांची केजरीवाल यांनी अंमलबजावणी केली नाही. राजकारण माणुसकीपेक्षा मोठं झालं आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच कल्याणकारी कामे करण्यापेक्षा ते चांगल्या कामात अडथळाच निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे दिल्लीकर यावेळी त्यांना धडा शिकवतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.