ETV Bharat / bharat

यमुनानगर जिल्ह्यात मजुरांनी महामार्गावरील वाहतूक रोखल्याने पोलिसांचा लाठीमार

author img

By

Published : May 17, 2020, 1:10 PM IST

police-lathi-charge-on-the-laborers
मजुरांवर पोलिसांचा लाठीमार

घरी परत जाण्याच्या मागणीसाठी स्थलांतरित मजुरांनी यमुनानगर जिल्ह्यातील महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. ही माहिती समजल्यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण मजूर महामार्गावरुन न हटल्याने लाठीमार करण्यात आला.

यमुनानगर (हरियाणा) - पंजाब राज्यातून घरी परतण्यासाठी आलेल्या मजुरांनी यमुनानगर जिल्ह्यातील करेडा खुर्द येथे गोंधळ घातला. राष्ट्रीय महामार्गावर येऊन मजुरांनी गावी जाण्यासाठी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी मजुरांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजुरांनी त्यांची महामार्ग रिकामा न केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

यमुनानगर जिल्ह्यात मजुरांनी महामार्गावरील वाहतूक रोखल्याने पोलिसांचा लाठीमार

यमुनानगर जिल्हा प्रशासनाने पंजाब आणि चंदीगढ येथून येणाऱ्या मजुरांच्या मुक्कामाची व्यवस्था सरकारी शाळांमध्ये केली आहे. येथून मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात येते. स्थलांतरित मजुरांनी त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत, असे सांगितले. आम्हाला लवकर घरी परत जायचे आहे पण लॉकडाऊन आहे, त्यामुळे जाता येता नाही म्हणून महामार्ग अडवला असल्याचे मजुराने सांगितले.

लॉकडाऊनमुळे सर्वांना घरी परत जायचे असल्याने छोट्या- मोठ्या वादावादीच्या घटना घडत आहेत, असे पोलीस अधीक्षक हिमांशू गर्ग यांनी सांगितले. स्थलांतरित मजुरांची समजूत काढून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.