ETV Bharat / bharat

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील कलाकारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद..

author img

By

Published : Jan 24, 2021, 8:19 PM IST

PM Modi interacts with artists ahead of R-Day
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील कलाकारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद..

यावर्षीचा प्रजासत्ताक दिन अवघ्या दोन दिवसांवर आला असताना, हे सर्व कलाकार आणि कॅडेट्स दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज या सर्व कलाकारांशी संवाद साधला...

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत देशभरातील कलाकार सहभागी होतात. यासोबतच, देशभरातून आलेले विद्यार्थी, जवान यादिवशी होणाऱ्या विशेष परेडमध्ये सहभागी होतात. यावर्षीचा प्रजासत्ताक दिन अवघ्या दोन दिवसांवर आला असताना, हे सर्व कलाकार आणि कॅडेट्स दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज या सर्व कलाकारांशी संवाद साधला.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील कलाकारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद..

तुम्ही दाखवता देशातील विविधतेची झलक..

यावेळी विविध कलाकार, एनसीसी कॅडेट्स आणि इतर सर्वांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. ते म्हणाले, की "प्रजासत्ताक दिनी जेव्हा तुम्ही प्रंचड उर्जेने आणि उत्साहाने येथील राजपथावर संचलन करता, आपली कला सादर करता. तेव्हा तुमचा तोच उत्साह तुम्ही देशातील प्रत्येक नागरिकामध्ये भरत असता. तुम्ही आपल्या देशाची समृद्ध कला, संस्कृती, परंपरा आणि वारसा याची एक झलक याठिकाणी दाखवून देता. यावेळी तुम्हाला पाहून देशातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावते."

प्रजासत्ताक दिनाची परेड म्हणजे देशाच्या एकतेला सलाम..

"प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी करतानात तुम्हाला लक्षात आलं असेल, की आपला देश किती विविधतेने नटलेला आहे. कित्येक भाषा, कित्येक पोटभाषा आणि प्रत्येकाची वेगळी संस्कृती, वेगळे खाद्यपदार्थ. मात्र या सर्व विविधतेनंतरही आपला देश एक आहे. प्रजासत्ताक दिनाची परेड ही आपल्या देशाच्या महान विविधतेला, आणि आपल्या संविधानाला - ज्यामुळे हे सर्व एकत्र बांधले गेले आहे - सलाम ठोकते." असेही मोदी यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमावेळीही कित्येक कलाकारांनी आपली कला पंतप्रधानांसमोर सादर केली.

हेही वाचा : राजस्थानमधील उंटही ट्रक्टर रॅलीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.