ETV Bharat / bharat

'अद्याप संकट टळले नाही', पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हिडिओ कॉन्फरन्स

author img

By

Published : Apr 27, 2020, 3:48 PM IST

Updated : Apr 27, 2020, 4:32 PM IST

narendra modi
देशातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला.

देशातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. विविध मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना विषयावरील ही चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. विविध मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना विषयावरील ही चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.

  • CM Uddhav Balasaheb Thackeray in an on going video conference with the Hon’ble Prime Minister @narendramodi ji, Union Home Minister @AmitShah ji along with the Chief Ministers of other States on further steps to be taken to beat Coronavirus. pic.twitter.com/4xwBcQSfPj

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानांच्या कॉन्फरन्समधील मुद्दे

  • कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर भारताबरोबर असणारे २० देश आज ७ ते ८ आठवड्यांनी गंभीर परिस्थितीचा सामना करत आहेत. भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. तसेच मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
  • भारतावर अद्याप संकट टळलेले नाही. पहिले २१ दिवसांचे लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेले लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.
  • आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांच्या तत्काळ चाचण्या करायच्या आहेत.
  • लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे, ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे.
  • कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “ दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूळ काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.
  • 'लॉकडाऊन राहील आणि जीवनही सुरळीत सुरू असेल', असा समतोल ठेवणारे धोरण बनवा
  • एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे; तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरू करायचे आहेत.
  • ३ मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली, तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
  • संक्रमण क्षेत्रांची संख्या न वाढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आवश्यक ते सर्व काही करा.
  • पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरू राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे की नाही, दुकाने कशी सुरू राहतील, यासंदर्भात लवकर धोरण जाहीर करा.
  • मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते पसरणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे जास्तीत जास्त संपर्क तपासा.
  • सध्याच्या उद्रेकात 'ग्रीन झोन्स' म्हणजे तर 'तीर्थस्थळ'

झोन्स 'फूल प्रुफ' करण्यासाठी सूचना

  • कोरोनाचा आकडा वाढणाऱ्या राज्यात आकड्यांचा दबाव येऊ देऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहे, म्हणजे काही ती महान आहेत, असाही अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.
  • कोरोनव्यतिरिक्त इतर आजारांचे रुग्णांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरू राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले पाहिजेतच.
  • ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे, त्या ठिकाणी आर्थिक नुकसानही जास्त होणार. २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली. पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत, ते अभ्यासा.
  • रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचे नियोजन आवश्यक आहे.
Last Updated :Apr 27, 2020, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.