ETV Bharat / bharat

..म्हणून उत्तर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ

author img

By

Published : Sep 4, 2020, 10:53 PM IST

बारामुल्लातील पट्टन भागातील यारीपोरा भागात आज सुरक्षा दलांनी शोध मोहिम राबवत तीन दहशतवाद्यांना ठार केले. मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरवरील आपले लक्ष हटविले असून उत्तर आणि मध्य काश्मीरातील कारवायांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामागील कारण लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज(शुक्रवार) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत लष्करातील अधिकारी आणि काश्मीर पोलीस दलातील एक कर्मचारी जखमी झाला. मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरवरील कारवायांवरून आपले लक्ष्य हटविले असून उत्तर आणि मध्य काश्मीरवर लक्ष वळविले आहे.

बारामुल्लातील पट्टन भागातील यारीपोरा भागात आज सुरक्षा दलांनी शोध मोहिम राबवत तीन दहशतवाद्यांना ठार केले. मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरवरील आपले लक्ष हटविले असून उत्तर आणि मध्य काश्मीरातील कारवायांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामागील कारण लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दहशतवादी कारावाईत बदल होण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे, दक्षिण काश्मीरमधील कारवाया आणि हल्ले थांबविले तर तेथील हस्तक आणि पाठिंबा देणाऱ्या लोकांवरील दबाव कमी होईल, लष्कराचे त्यांच्यावर लक्ष जाणार नाही. दुसरे कारण म्हणजे, जास्त घनतेचा श्रीनगर प्रदेश, बारामुल्ला आणि उत्तर काश्मीरमधील दुर्गम भागात हल्ले घडवून आणताना दहशतवाद्यांना जलद हालचाली करता येतील. ही दोन कारणे लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत. काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दावा केला होता की, जून महिन्याच्या शेवटीपर्यंत दक्षिण काश्मीर कारवायांपासून मुक्त करण्यात येईल.

बारामुल्लात दोन दहशतवादी तळ नष्ट

३० ऑगस्टला बारामुल्लाच्या रामपूर सेक्टरमध्ये काही संशयित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यांच्या हालचालींवर सुरक्षा पथके लक्ष ठेऊन होती. त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. डोंगराळ आणि घनदाट झाडी असलेला भूभाग, खराब हवामान अशा परिस्थितीत घुरखोरीची शक्यता अधिक असते. त्यामुळे सीमेवर गस्त वाढविण्यात आली होती. रात्रीच्या वेळीही या भागास्त गस्त घालण्यात येत होती. सात तासांच्या सर्च ऑपरेशननंतर लष्कराला दोन दहशतवादी तळ आढळून आले होते. येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लष्कराने जप्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.