ETV Bharat / bharat

काश्मीरमधून तब्बल दहा हजार सैनिकांना तातडीने बोलावले परत; गृहमंत्रालयाचे आदेश

author img

By

Published : Aug 19, 2020, 8:50 PM IST

जम्मू काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांच्या तैनातीचा आढावा मंत्रालयाने घेतला होता. त्यानंतर सीएपीएफच्या १०० तुकड्यांना त्वरीत आपापल्या पूर्वीच्या ठिकाणी तैनात होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

MHA orders 'immediate' withdrawal of 100 companies of paramilitary forces from J-K
जम्मू-काश्मीरमधील पॅरामिलिट्रीच्या १०० तुकड्यांना तातडीने बोलावले परत; गृहमंत्रालयाचे आदेश

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमध्ये तैनात असणाऱ्या विविध पॅरामिलिट्री फोर्सेसमधील जवानांना तातडीने परत बोलावले आहे. सुरक्षा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमधील सीआरपीएफ जवानांच्या तैनातीचा आढावा मंत्रालयाने घेतला होता. त्यानंतर सीएपीएफच्या १०० तुकड्यांना त्वरीत आपापल्या पूर्वीच्या ठिकाणी तैनात होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

या एका तुकडीमध्ये साधारणपणे १०० जवान असतात. मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार, सीआरपीएफच्या ४०, बीएसएफ आणि सीआयएसएफच्या प्रत्येकी २० आणि सशस्त्र सीमा बलच्या २० तुकड्यांना काश्मीरमधून आपापल्या आधीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

यापूर्वीही सीएपीएफच्या दहा तुकड्यांना जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आले होते. तसेच, डिसेंबरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर सीएपीएफच्या ७२ तुकड्यांना आपल्या पूर्वीच्या ठिकाणी परतण्याचे आदेश देण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते.

मागील वर्षी कलम ३७० रद्द केल्यानंर काश्मीरमध्ये या तुकड्यांना तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा : शोपियानमध्ये ग्रेनेड आणि बुलेट्स जप्त, चौघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.