ETV Bharat / bharat

धक्कादायक! निर्दयी पित्याकडून 54 आठवड्याच्या अर्भकाला गंभीर मारहाण

author img

By

Published : Jun 24, 2020, 6:57 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. आरोपीची पुढील चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे अंगामली पोलीस स्थानकातील अधिकाऱ्याने सांगितले.

कोची (केरळ) – मुलगी झाल्याच्या रागातून निर्दयी पित्याने 54 दिवसांच्या अर्भकाला बेडवर जोरात फेकून दिल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. या आरोपीने अर्भकाच्या डोक्यात जोराने मारले होते. शैजू थॉमस असे 40 वर्षीय आरोपीचे नाव आहे.

आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. आरोपीची पुढील चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे अंगामली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

मागील गुरुवारी डोक्याला गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत 54 दिवसांचे अर्भक खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपी थॉमस हा क्न्नूर येथील रहिवासी आहे. तो त्याच्या नेपाळी पत्नीबरोबर भाड्याच्या घरात राहत आहे. मुलीला बरे वाटल्यानंतर मायदेशी परतण्याची इच्छा असल्याचे आरोपीच्या पत्नीने सांगितले. आरोपी हा मद्यपी असल्याचे सांगण्यात येते. मुलगी झाल्याने त्याचा पत्नीबरोबर वाद झाला होता.

पोलिसांनी काही वेळ चौकशी केल्यानंतर निर्दयी पित्यानेच मुलीला क्रूरपणे मारल्याचे निष्पन्न झाले होते. ते अर्भक बेडवरून पडल्याने जखमी झाले नव्हते. जखमी अर्भकाववर डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांनी अर्भकावर महत्त्वाची शस्त्रक्रिया केली आहे. धोक्याची स्थिती टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.