ETV Bharat / bharat

भाजपाचे नेते केसरी नाथ त्रिपाठी यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jan 2, 2021, 9:45 AM IST

भाजपा नेते
भाजपा नेते

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि भाजपाचे नेते केसरी नाथ त्रिपाठी यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि भाजपाचे नेते केसरी नाथ त्रिपाठी यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना प्रयागराजमधील निवास्थानी होमआयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या 871 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रिकव्हरी रेट 96.21 टक्के आहे. 13 हजार 823 रुग्णांची आतापर्यंत राज्यात नोंद झाली आहे. तर लखनऊ शहरात शुक्रवारी 73 रुग्ण आढळले आहेत. तर प्रयागराज आणइ बाल्लीयामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांवर लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

राज्यात एकूण पाच ठिकाणी ड्राय रन -

राज्यात आजपासून ड्राय रन सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये तीन सत्रस्थळांमध्ये ड्राय रन सुरू करण्यात येत आहे. लखनऊच्या सहा रुग्णालयामध्ये ही प्रकिया होणार आहे. राज्यात एकूण पाच ठिकाणी ड्राय रन लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच यूकेमधून परतलेल्या नागरिकांना 28 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. होम आयसोलेशन सुविधा त्यांना देण्यात आली नाही.

आजपासून ड्राय रन सुरू -

भारतामध्ये कोरोना लसीची तयारी पूर्ण झाली आहे. आता लवकरच लसीकरणाला देखील सुरूवात केली जाणार आहे. मात्र लसीकरणाच्या तारखेची घोषणा करण्याआधी सर्व तयारीची चाचपणी, केंद्र सरकारकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून देशभरातील सर्व राज्यांमध्ये ड्राय रन घेतला जात आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या ४ जिल्ह्यात ड्राय रन होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.