ETV Bharat / bharat

'गुन्हे घडतच असतात, त्यांना मोदी रोखू शकत नाहीत' काँग्रेस नेत्याचे बेताल वक्तव्य

author img

By

Published : Oct 10, 2020, 6:36 PM IST

राजस्थान
राजस्थान

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी भाजपवर टीका केली. हाथरस घटनेचा आणि पुजाऱ्याच्या हत्येचा संबध जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटना होत असतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीही थांबवू शकत नाही, असे गोविंद सिंह डोटासरा म्हणाले.

नवी दिल्ली - राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका पुजाऱ्याच्या हत्येने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे खासदार किरोडी लाल मीणा धरणे आंदोलन करत असून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी भाजपवर टीका केली. हाथरस घटनेचा आणि पुजाऱ्याच्या हत्येचा संबध जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटना होत असतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीही थांबवू शकत नाही. मात्र, घटनेनंतर प्रशासन काय कारवाई करते, हे महत्वाचे आहे. हाथरसमध्ये पीडित कुटुंबाला निर्दयतेने वागवण्यात आले. मात्र, राजस्थानमध्ये दोषींवर कारवाई करण्यात येत आहे', असे गोविंद सिंह डोटासरा म्हणाले.

राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा

पुजाऱ्याच्या कुटुंबासोबत जे झाले. ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होते. मात्र, राजकीय स्वार्थापोटी काही लोक या घटनेचे राजकारण करत आहेत. हाथरसप्रमाणे करौलीमध्ये माध्यमांवर बंदी नाही. येथे पीडित कुटुंबाला न्याय देण्याची प्रकिया सुरु आहे, असेही ते म्हणाले.

तथापि, सपोटरा तहसीलमधील एका गावात मंदिरातील पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. गुरुवारी गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याची जयपूरमधील सवाई माधोसिंह रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात या विषयावरुन राजकारण पेटले आहे. विरोधकांनी गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, सरकारने पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत केली असून कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वानस दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.