ETV Bharat / bharat

कश्मीर खोऱ्यात एका दिवसात 14 कोरोनाग्रस्तांची नोंद, प्रशासनाने केले कडक निर्बंध

author img

By

Published : Apr 5, 2020, 4:39 PM IST

कोरोनाला रोखण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याचे प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. कश्मीर खोऱ्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आज (रविवार) एका दिवसात कश्मीर खोऱ्यात 14 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने तेथील नियम कडक केले आहेत.

Kashmir Valley
कश्मीर खोऱ्यात एका दिवसात 14 कोरोनाग्रस्तांची नोंद

श्रीनगर - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही दिवसेंदिवस वाढत दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याचे प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. कश्मीर खोऱ्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आज (रविवार) एका दिवसात कश्मीर खोऱ्यात 14 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने नियम कडक केले आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कश्मीर खोऱ्यातील मुख्य मुख्य रस्ते सिलंबद केले आहेत. लोकांच्या हालचालींवर सुरक्षा दलाती करडी नजर आहे. परिसरात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. तरीही काही ठिकाणी लोक कामात अडथळे आणत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर कश्मीरमधील सर्उ उद्याने, व्यायामशाळा, क्लब आणि रेस्टॉरंट्ससह सर्व सार्वजनिक ठिकाणे शैक्षणिक संस्था बंद करण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.