ETV Bharat / bharat

प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांचे भारतात आगमन

author img

By

Published : Jan 24, 2020, 6:58 PM IST

ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियास बोलसोनारो
ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियास बोलसोनारो

यंदा देशात साजऱ्या होत असलेल्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियास बोलसोनारो उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली - 26 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आमंत्रित प्रमुख पाहुण्यांचे दिल्लीत आगमन झाले आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियास बोलसोनारो हे यंदाचे प्रमुख पाहुणे आहेत. बोलसोनारो यांचे आज भारतामध्ये आगमन झाले असून आजपासून म्हणजे 24 ते 27 जानेवारीपर्यंत त्यांचा हा भारत भेटीचा राजकीय दौरा असणार आहे.


बोलसोनारो यांचा हा पहिला भारत दौरा आहे. यापूर्वी 1996 आणि 2004 ला ब्राझीलचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. ब्राझील हा भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार असून भारत आणि ब्राझील दरम्यान अनेक गुंतवणुकीचे करार झाले आहेत. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या अकराव्या ब्रिक्स परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलसोनारो यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते.


प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी भारताकडून मित्र आणि सहयोगी देशांच्या प्रमुखांना भारतात निमंत्रित केले जाते. देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो आले होते. तर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा २०१९च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले होते.

Intro:Body:

https://www.aninews.in/news/national/general-news/brazil-president-in-india-tomorrow-bilateral-ties-set-for-big-boost20200123221854/


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.