ETV Bharat / bharat

धार्मिक स्थळांवरील जंतुविरहित नैवेद्य, प्रसादासाठी 'भोग' योजना

author img

By

Published : Oct 23, 2020, 5:52 PM IST

'प्रसाद बनवताना सर्व धार्मिक ठिकाणी स्वच्छताविषयक मापदंड पाळले जावेत, अशी एफएसडीएची इच्छा आहे. मंदिराबाहेर प्रसाद विक्री करणार्‍या विक्रेत्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले जाईल,' असे लखनऊमधील एफएसडीए अधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले.

लखनऊ मंदिर न्यूज
लखनऊ मंदिर न्यूज

लखनऊ - अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (दि फूड सेफ्टी अँड ड्रग अ‌ॅडमिनिस्ट्रेशन - एफएसडीए) लखनऊमध्ये 'ब्लिसफुल हायजेनिक ऑफरिंग टू गॉड' (भोग) या योजनेचा शुभारंभ केला आहे.

यामुळे या उत्सवांच्या हंगामात भाविकांना विविध धार्मिक स्थळांवर स्वच्छ, जंतुविरहित 'प्रसाद', 'लंगर', 'भंडारा' आणि 'भोग' मिळतील.

'प्रसाद बनवताना सर्व धार्मिक ठिकाणी स्वच्छताविषयक मापदंड पाळले जावेत, अशी एफएसडीएची इच्छा आहे. मंदिराबाहेर प्रसाद विक्री करणार्‍या विक्रेत्यांना स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले जाईल,' असे लखनऊमधील एफएसडीए अधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले.

हेही वाचा - भारत-अमेरिकेदरम्यान 27 ऑक्टोबरला नवी दिल्लीत 'टू-प्लस-टू' चर्चा

'पहिल्या टप्प्यात आम्ही हनुमान सेतू मंदिर, अलीगंज हनुमान मंदिर, मनकामेश्वरा मंदिर, अलीगंजमधील गुलाचीन मंदिर तसेच, आशियाना गुरुद्वारा अशी चार मंदिरे सुरुवातीला निवडली आहेत. तेथे आमचे कर्मचारी अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रसाद आणि भोग विक्रेत्यांना प्रशिक्षण देतील. अन्न खरेदी करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत चांगल्या पद्धतींबद्दल जागरूकता वाढविणे हे आमचे उद्दीष्ट आहे,' असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचा - देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये लखनऊ तिसर्‍या क्रमांकावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.