ETV Bharat / bharat

कुंभमेळ्याचे भव्य स्वरुपात होणार आयोजन; आखाडा परिषदेच्या बैठकीत निर्णय

author img

By

Published : Nov 21, 2020, 10:12 PM IST

महाकुंभच्या आयोजनासंदर्भात आज जुना अखाड्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक झाली. ही बैठक ४ तास चालली. बैठकीत सर्व १३ अखाड्यांनी हरिद्वार येथे होऊ घातलेला महाकुंभ भव्य स्वरुपात आयोजित करण्याचे ठरले.

Akhil Bharatiya Akhara Parishad Meeting
अखाडा परिषद बैठक

हरिद्वार (उत्तराखंड) - महाकुंभच्या आयोजनासंदर्भात आज जुना अखाड्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक झाली. ही बैठक ४ तास चालली. बैठकीत सर्व १३ अखाड्यांनी हरिद्वार येथे होऊ घातलेला महाकुंभ भव्य स्वरुपात आयोजित करण्याचे ठरले. बैठकीला नगरविकास मंत्री मदन कौशिक देखील उपस्थित होते.

कुंभ मेळ्यात टेंट लावू देणार नाही, असा राज्य सरकारचा निर्णय होता. मात्र, आजच्या बैठकीत २०१०प्रमाणे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येईल. पंडाल आणि तंबू बसवण्यासाठी जमीन देण्यात येईल, तसेच बैरागी शिबिरात बैरागी अखाड्यांचे तंबू लागतील. बैरागी शिबिरांना तोडण्यात येणार नाही. त्याचबरोबर, रस्ते, पाणी आणि विजेची व्यवस्था सरकार करेल, असे बैठकीत ठरल्याचे अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले.

माहिती देताना अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी

कुंभ मेळ्यात पेशवाई काढण्यात येणार

सगळेच महामंडलेश्वर कुंभमेळ्यात येतील. जर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, तर सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. महाकुंभमध्ये पेशवाईदेखील काढली जाईल आणि शाही आंघोळही होईल. तसेच, जे अखाडे आपल्या पेशवाईसाठी तारखेची घोषणा करतील, त्यांची त्याच वेळी पेशवाई काढली जाईल. बैरागी शिबिरांबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाकडे जाणार आहोत. बैरागीचे तिन्ही आखाडे लवकरच जमीन खरेदी करतील आणि त्यांना सरकारकडून मिळणारे पैसेही मिळतील, अशी माहिती गिरी यांनी दिली.

उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

उद्या आखाडा परिषदेच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार आहे. या बैठकीत साधू-संत मेळ्याशी संबंधित प्रमुख मुद्यांवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती कौशिक यांनी दिली. तसेच, कुंभमेळ्यात तंबू लावण्याबाबत सरकारकडून निर्बंध नाही, मात्र सरकार सध्या तंबू लावणार नाही. तसेच, आखाड्यांद्वारे काढण्यात येणारी पेशवाई ही कुंभमेळ्यात काढण्यात येईल आणि या वेळेसचा मेळा हा भव्य असणार, अशी माहिती कौशिक यांनी दिली.

हेही वाचा - 188 कोटी खर्चून दिल्लीत खासदारांसाठी नवी निवासस्थाने सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.