ETV Bharat / bharat

‘माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही'

author img

By

Published : May 21, 2019, 11:40 AM IST

याआधी पंजाबमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी इंदिरा गांधींप्रमाणे खासगी सुरक्षा अधिकाऱ्याकडून आपली हत्या होईल असा आरोप केला होता.

अरविंद केजरीवाल, नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - 'पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे माझीदेखील सुरक्षारक्षकांकडून हत्या होईल,' असा खळबळजनक आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोंधळ उडवून दिला होता. यानंतर पोलिसांवर संशय व्यक्त केल्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला उत्तर देताना 'माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही,' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यातून पंतप्रधान मोदींवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

याआधी पंजाबमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी इंदिरा गांधींप्रमाणे खासगी सुरक्षा अधिकाऱ्याकडून आपली हत्या होईल असा आरोप केला होता. दिल्ली केंद्रशासित प्रदेश असून दिल्ली पोलीस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा सर्व अधिकार राज्य सरकारकडे दिले जावेत, अशी मागणी केली आहे. केजरीवाल यांच्या आरोपामुळे वाद निर्माण झाला होता.

दिल्ली भाजपने पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल यांची सुरक्षा काढून घेण्यास सांगितलं होते. दिल्ली भाजप प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून केजरीवाल यांना 'माफी मागण्यास सांगा' असे सांगितले होते. तर, ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी ट्विट करत 'तुम्ही पोलिसांचे नाव खराब केले असून आता तुमचा सुरक्षा अधिकारी तुम्हीच निवडावा,' असा टोला लगावला आहे.

‘आपल्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यावर संशय घेत तुम्ही दिल्ली पोलिसांचे नाव खराब केले आहे. तुम्हीच तुमचा खासगी सुरक्षा अधिकारी निवडणे जास्त योग्य ठरेल. तुम्हाला काही हवे असल्यास कळवा. दिर्घायुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’, असे ट्विट गोयल यांनी केले होते. यानंतर ‘विजयजी, माझा खासगी सुरक्षा अधिकाऱ्याची नाही तर, नरेंद्र मोदींची माझी हत्या व्हावी अशी इच्छा आहे,’ असे उत्तर केजरीवाल यांनी दिले आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.