World Wrestling Championship : बजरंग पुनियाने सेबॅस्टियन रिवेराचा पराभव करत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटकावले चौथे पदक

author img

By

Published : Sep 19, 2022, 12:46 PM IST

Bajrang Punia

बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले ( Bajrang Punia won bronze medal in WWC ) आहे. यासह भारताला या स्पर्धेत दोन पदके मिळाली आहेत. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात पोर्तुगालच्या सेबॅस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केला.

बेलग्रेड : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने ( Olympic bronze medalist Bajrang Punia ) जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. पुनियाने 0-6 ने पुनरागमन करत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराला 11-9 ने पराभूत करून पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात कांस्यपदक ( Bajrang Punia Defeating Sebastian Rivera ) जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कांस्यपदक जिंकले होते.

तत्पूर्वी, बजरंगला ( Wrestler Bajrang Punia ) उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन डायकोमिहलिसने पराभूत केले होते. त्यानंतर बजरंगने रेपेचेजच्या माध्यमातून कांस्यपदकाचा सामना गाठला आणि जिंकला. रेपेचेजच्या पहिल्या सामन्यात बजरंगने आर्मेनियाच्या वेगेन टेवान्यानचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. बजरंगने पहिल्याच सामन्यात डोक्याला दुखापत झालेल्या दुखापती सोबत मोहिमेला सुरुवात केली होती.

  • Olympic bronze medallist Bajrang Punia wins his fourth medal at the world championships by defeating Sebastian Rivera of Puerto Rico 11-9 to bag a bronze in the men's 65 Kg weight category at Belgrade.

    (file pic) pic.twitter.com/7g85Dp03Y2

    — ANI (@ANI) September 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संपूर्ण स्पर्धेत तो काही खास दिसला नाही, पण त्याने महत्त्वाच्या क्षणी त्याच्या अनुभवाचा उपयोग करून प्रतिस्पर्ध्यांवर मात करून भारतासाठी पदक जिंकले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या ( World Wrestling Championship ) कांस्य पदक प्लेऑफ सामन्यात 6-0 ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगने ( Bajrang Punia ) शानदार पुनरागमन करत 11-9 असा विजय मिळवला.

हेही वाचा - Indw Vs Engw 1st Odi : स्मृती मंधानाच्या झंझावाताने इंग्लंडचा संघ उद्ध्वस्त, भारतीय महिला संघा 7 विकेट्सनी विजयी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.