ETV Bharat / bharat

Bajrang Dal Ban : बजरंग दलावरून कॉंग्रेसचा यू-टर्न; सत्तेत आल्यावर बंदी घालणार नाही - दिग्विजय सिंह

author img

By

Published : Aug 16, 2023, 8:18 PM IST

Digvijaya Singh
दिग्विजय सिंह

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा गाजला होता. आता तो मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कॉंग्रेसने याप्रकरणावरून यू-टर्न घेतला आहे. 'मध्य प्रदेशात सत्ता आल्यावर बजरंग दलावर बंदी घातली जाणार नाही', असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.

दिग्विजय सिंह

भोपाळ (मध्य प्रदेश) : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हनुमानाचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी कॉंग्रेसने बजरंग दलाविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. पक्षाने त्यावेळस राज्यात अशा संघटनांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही म्हटले होते. मात्र आता कॉंग्रसेच्या भूमिकेत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नुकतेच बजरंग दलाबाबत एक मोठे वक्तव्य केले.

बजरंग दलात अनेक चांगले लोक आहेत : 'मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घातली जाणार नाही. बजरंग दलात अनेक चांगले लोक आहेत, मात्र त्यात जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना सोडले जाणार नाही', असे दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच, 'बजरंग दल ही गुंडाची संघटना असून, त्याद्वारे अनेक समाजकंटक समाजात फिरत आहेत', असेही दिग्विजय सिंह म्हणाले.

मी कोणत्याही भाजपा नेत्यापेक्षा मोठा हिंदू आहे : एका प्रश्नाच्या उत्तरात दिग्विजय सिंह म्हणाले की, 'मी हिंदू आहे आणि हिंदूच राहणार. मी कोणत्याही भाजपा नेत्यापेक्षा मोठा हिंदू आहे', असेही ते म्हणाले. भाजपाने कमलनाथ यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडले, असे दिग्विजय सिंह म्हणाले. 'देशात सर्वाधिक हिंदू आहेत. त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. कमलनाथ यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. आमचा विश्वास संविधानावर आहे आणि राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते', असे दिग्विजय सिंह म्हणाले.

राम मंदिर उभारणीत भ्रष्टाचार झाला : यावेळी बोलताना दिग्विजय सिंह यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर निशाणा साधला. 'भाजपा सरकारमध्ये धार्मिक स्थळांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. जमीन खरेदीपासून ते राम मंदिर उभारणीपर्यंत अनेक गैरप्रकार झाले आहेत. कॅगच्या अहवालात बांधकामातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे', असे दिग्विजय म्हणाले. 'मध्य प्रदेशातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. तुम्ही कोणत्याही कंत्राटदाराशी बोला, तो तुम्हाला कशाप्रकारे त्यांना कमिशन वाटप करावे लागते हे सांगेल, असे ते म्हणाले.

राम मंदिराच्या कामाचा हिशोब दिला नाही : दिग्विजय सिंह यांनी यावेळी भाजपावर आरोप केला. 'सर्वत्र अनियंत्रित भ्रष्टाचार होत आहे. धार्मिक कार्यातही भ्रष्टाचार होत आहे. आधी राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू असताना हजारो कोटी रुपये गोळा करण्यात आले. मात्र आजपर्यंत त्याचा हिशोबच दिलेला नाही. त्यानंतर जी दोन कोटींची जमीन विकत घेतली ती आठवडाभरात २० कोटींना विकत घेतली गेली. आता तर मोदी सरकारचा कॅगचा अहवाल येत आहे. ज्यात म्हटले आहे की बांधकामात काम न करणाऱ्या कंत्राटदारांनाही पैसे देण्यात आले आहेत', असे आरोप दिग्विजय सिंह यांनी केले.

हेही वाचा :

  1. Digvijaya Singh News: माजी सरसंघचालक गोळवलकरांविरोधात वादग्रस्त ट्विट, दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.