ETV Bharat / bharat

Pandit Dhirendra Shastri Marriage : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचं ठरलं लग्न.. कोण आहे होणारी नवरी? म्हणाले, 'लवकरच..'

author img

By

Published : Jan 31, 2023, 1:59 PM IST

लग्नाची चर्चा सुरु असताना आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ते लवकरच लग्न करणार आहेत, परंतु सर्वांना आमंत्रित करणे कठीण आहे, त्यामुळे ते सर्वांना ऑनलाइन आमंत्रित करणार आहेत.

Bageshwar Dham Pandit Dhirendra Shastri statement on marriage said- will marry soon, but will not be able to invite many people
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचं ठरलं लग्न.. कोण आहे होणारी नवरी? म्हणाले, 'लवकरच..'

छतरपूर (मध्यप्रदेश) : देशातील प्रसिद्ध कथाकार बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या चाहत्यांना ते कधी आणि कोणासोबत लग्न करणार हे जाणून घेण्याची घाई झाली आहे. सध्या या सर्व गोष्टींवर खुद्द बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. बागेश्वर धामचे 26 वर्षीय पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी लग्नाविषयी सांगितले आहे की, 'आपण लवकरच लग्न करणार आहोत.' काल रात्री उशिरा छतरपूरमध्ये बागेश्वर धामचा दरबार पार पडला, त्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

लग्नाबाबत काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री बागेश्वर धामचा दरबार पार पडला. त्यादरम्यान लग्नाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी स्वत:हून हजारो लोकांमधील अफवांबाबत उत्तर दिले आहे. लग्नासाठी सर्व लोकांना बोलावणे शक्य नसल्याने आता लग्नाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करणार असल्याचेही पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी यावेळी सांगितले.

अनेक महापुरुषही गृहस्थ जीवन जगले : ते म्हणाले की, 'अनेकदा आमच्या लग्नाचीही चर्चा चालते. आता बघा ना, आम्ही साधू-संत नाही, अगदी साधी माणसं आहोत. आम्ही आमच्या ऋषीमुनींच्या परंपरेतल्या भगवान बालाजींच्या चरणी राहतो. अनेक महापुरुषांनी गृहस्थ जीवन जगले आणि नंतर गृहस्थाच्या जीवनात देवही अवतरला. म्हणजे आधी ब्रह्मचारी, नंतर गृहस्थ, वानप्रस्थ आणि नंतर संन्यास ही परंपरा आहे आणि ती आम्ही पाळू. लवकरच आमचे लग्न होणार आहे आणि त्यासाठी सर्वांना बोलावले जाईल. परंतु अधिक लोकांना लग्नासाठी थेट बोलावणे शक्य नाही. त्यांचे व्यवस्थापन कोण करणार? त्यामुळे आम्ही प्रत्येकासाठी लग्नाचे थेट प्रक्षेपण करू.'

जया किशोरी तर माझी बहीण : नुकतेच बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे नाव कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी यांच्याशी जोडण्यात येत होते. दोघेही एकमेकांशी लग्न करणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्या होत्या. यानंतर खुद्द पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी याचा इन्कार केला आणि जयाला आपली बहीण असल्याचे सांगितले. तरीही जया यांनी आजपर्यंत बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळख असलेल्या धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. देशातील प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी नेहमीच चर्चेत असतात. जे त्यांना ओळखतात ते त्यांच्या लग्नाची बातमी आणि तारीख ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

हेही वाचा: Dhirendra Shastri Bageshwar Dham कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा नवा व्हिडीओ समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.