ETV Bharat / bharat

Asia Cup 2022 : सुपर 4 सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर, अक्षर पटेलचा समावेश

author img

By

Published : Sep 2, 2022, 7:16 PM IST

Ravindra Jadeja
रवींद्र जडेजा

आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला ( Ravindra Jadeja ruled out of Asia Cup ) आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) स्पर्धेतील सुपर 4 सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला ( Ravindra Jadeja ruled out of Asia Cup ) आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला ( Akshar Patel replaces Jadeja ) आहे. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करणारा अष्टपैलू जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

शुक्रवारी, बोर्डाने दुखापतीमुळे तो स्पर्धेतील उर्वरीत सामन्यातून बाहेर पडला असल्याची माहिती शेअर केली. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली ( Ravindra Jadeja right knee injury ) आहे. त्यामुळे तो उर्वरित सामन्यांसाठी संघाचा भाग असणार नाही. त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे ( Medical team focus on Jadeja injury ) बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संघात राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आलेल्या अष्टपैलू अक्षर पटेलला जडेजाच्या जागी मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे.

जडेजाने पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्यासोबत सहाव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. 29 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 35 धावांची मौल्यवान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. हाँगकाँगविरुद्ध फलंदाजी करण्याची पाळी जडेजाची नव्हती. 4 षटके टाकताना 15 धावांत 1 बळी घेतला.

आशिया कपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चहर

हेही वाचा - Virat Kohli Restaurant विराट कोहली सुरु करणार किशोर कुमारांच्या मुंबईतील बंगल्यात रेस्टॉरंट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.