ETV Bharat / bharat

२१व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भरला अर्ज; झाली राज्यातील सर्वात तरुण सरपंच!

author img

By

Published : Jan 3, 2021, 3:36 PM IST

Reshma Mariam Roy assumes office as the youngest Grama Panchayath President in Kerala
२१व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भरला अर्ज; झाली सरपंच!

काही दिवसांपूर्वीच अवघ्या २१ वर्षांच्या तरुणीची महापौर म्हणून निवड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता केरळमध्येच आणखी एका २१ वर्षाच्या तरुणीला नागरिकांनी सरपंच म्हणून निवडून दिले आहे. रेश्माने १८ नोव्हेंबर २०२०ला आपला २१वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने स्थानिक निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या वॉर्डमध्ये, ७० मतांच्या मताधिक्याने ती सीपीआयएमकडून निवडून आली.

तिरुवअनंतपुरम : काही दिवसांपूर्वीच अवघ्या २१ वर्षांच्या तरुणीची महापौर म्हणून निवड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर आता केरळमध्येच आणखी एका २१ वर्षाच्या तरुणीला नागरिकांनी सरपंच म्हणून निवडून दिले आहे. रेश्मा मरियम रॉय असे या तरुणीचे नाव आहे. राज्याच्या पाथानमथिट्टा जिल्ह्यातील अरुवाप्पुलम गावची ती सरपंच झाली आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही..

विशेष म्हणजे, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तिने हे यश प्राप्त केले आहे. रेश्माचे वडील हे एक लाकूड व्यापारी असून, आई एका महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. तिला एक भाऊदेखील आहे.

२१व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भरला अर्ज..

रेश्माने १८ नोव्हेंबर २०२०ला आपला २१वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने स्थानिक निवडणुकांसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. अरुवाप्पुलमच्या ११व्या वॉर्डमधून तिने डाव्या पक्षांकडून आपला अर्ज भरला होता. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या वॉर्डमध्ये, ७० मतांच्या मताधिक्याने ती निवडून आली.

विविध संघटनांमध्ये आहे सहभाग..

रेश्माने व्हीएनएस महाविद्यालयातून बीबीए पदवी घेतली आहे. ती डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय)ची जिल्हा समिती सदस्य आहे. तसेच, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची (एसएफआय) जिल्हा सचिवालय सदस्य आहे. यासोबतच ती सीपीआयएम पक्षाची शाखा समिती सदस्यही आहे.

केरळमध्येच आहे जगातील सर्वात तरुण महापौर..

केरळमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आर्या राजेंद्रन ही २१ वर्षांची तरुणी निवडणूक जिकंली असून महापौर पदासाठीही तिचे नाव निश्चित झाले आहे. भारतातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान तिला मिळणार आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील तरुण महापौरांमध्ये तिची गणना होईल. केरळची राजधानी तिरुवअवनंतपूर शहराची महानगपालिका एका तरुणीच्या हातात येत असल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

हेही वाचा : ..तर प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये 'ट्रॅक्टर परेड' होईल; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.