ETV Bharat / bharat

Asian Track Cycling Championships : सायकलिंग स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताने जिंकली दोन कांस्यपदके

author img

By

Published : Jun 21, 2022, 3:28 PM IST

रोनाल्डो सिंग ( Ronaldo Singh ) एक किलोमीटर टाइम ट्रायल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. जागतिक ज्युनियर चॅम्पियन आणि आशियाई विक्रम धारक रोनाल्डोने 58.254 किमी प्रतितास वेगाने सायकलिंग करताना 1:1:798 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

Cycling
Cycling

नवी दिल्ली: आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिपच्या तिसर्‍या दिवशी भारताने सोमवारी दोन कांस्यपदके जिंकून ( India clinch two more bronze medals ) देशाच्या एकूण पदकांची संख्या 20 वर नेली. रोनाल्डो सिंग एक किलोमीटर टाइम ट्रायल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

जागतिक ज्युनियर चॅम्पियन आणि आशियाई विक्रम धारक रोनाल्डोने ( Asian record holder Ronaldo ) 58.254 किमी प्रतितास वेगाने सायकलिंग करताना 1:1:798 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत जपानच्या युता ओबाराने 1:01:118 सेकंद (59.902 किमी/ता) वेळ नोंदवून पहिला आणि मलेशियाच्या मोहम्मद फादिलने 1:1:639 सेकंदांचा वेळ नोंदवून दुसरा क्रमांक पटकावला.

बिरजीत युमनमने पुरुषांच्या ज्युनियर गटात 10 किमीच्या 40 लॅप्समध्ये भारतासाठी दिवसाचे दुसरे पदक जिंकले ( two more bronze medals on day-3 ). त्याने 35व्या लॅपनंतर लिया कार्बुतोव (कझाकिस्तान) आणि अमीर अली (इराण) यांना मागे टाकत पदक जिंकले. या स्पर्धेत कोरियाच्या हवारांग किमने सुवर्ण, तर मलेशियाच्या झुल्फमी आयमानने रौप्यपदक जिंकले.

हेही वाचा - अश्विन कोरोना पॉजिटीव्ह, ​​इंग्लंडवारी हुकली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.