ETV Bharat / bharat

Indian Meteorological Department Recruitment : भारतीय हवामान खात्यात ९९० पदांसाठी भरती ; या तारखेपर्यंत करा अर्ज

author img

By

Published : Oct 8, 2022, 10:26 AM IST

Updated : Oct 8, 2022, 11:54 AM IST

Indian Meteorological Department
भारतीय हवामान खाते

रतीय हवामान खात्यात नोकरीची संधी निर्माण झालेली (990 posts in Indian Meteorological Department) आहे. भारतीय हवामान खात्यामध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. वरिष्ठ वैज्ञानिक, कनिष्ठ संशोधक, सहाय्यक संशोधक अशा विविध पदांसाठी भरती आहे.

मुंबई : भारतीय हवामान खात्यात नोकरीची संधी निर्माण झालेली (990 posts in Indian Meteorological Department) आहे. भारतीय हवामान खात्यामध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. वरिष्ठ वैज्ञानिक, कनिष्ठ संशोधक, सहाय्यक संशोधक अशा विविध पदांसाठी भरती आहे. विज्ञान शाखेमध्ये पदवीधर पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांनी आवर्जून आजच अर्ज करावा. अंतिम मुदत ०९ ऑक्टोबर २०२२ (Apply for Indian Meteorological Department) आहे.


सर्व बीएससी, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर कमीत कमी साठ टक्के मार्कांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे. भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी एकूण 990 पदांची जाहिरात आहे. या परिक्षेसाठी फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. संपूर्ण भारतभर नोकरीची संधी असते. पण साधारण तीन वर्षानंतर उमेदवार व्यक्तीला आपले चॉईस स्टेशन (Indian Meteorological Department jobs) मिळते.


सर्व दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जून देतात. मात्र मराठी भाषिक उमदेवार या ठिकाणी अर्ज अधिक संख्येने करीत नाहीत, असा आजवरचा अनुभव असल्याचे दिसते. पुढील भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्या. आणि आजच अर्ज (990 posts in Indian Meteorological Department) करा.

Last Updated :Oct 8, 2022, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.