ETV Bharat / bharat

Owaisi On Asad Encounter : अतिक अहमदचा मुलगा असदच्या एन्काऊंटर ओवेसींकडून प्रश्न उपस्थित, म्हणाले...

author img

By

Published : Apr 13, 2023, 8:47 PM IST

उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमदचा मुलगा असदच्या एन्काऊंटरमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप, यूपी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ओवेसी काय म्हणाले जाणून घ्या.

Owaisi On Asad Encounter
Owaisi On Asad Encounter

हैदराबाद : एआयएमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यूपीमधील माफिया अतिक अहमदच्या मुलाच्या एन्काऊंटरवर निशाणा साधला आहे. त्यांनी या चकमकी प्रकरणी भाजप तसेच योगी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत ओवैसी म्हणाले की, भाजप, यूपी सरकार एन्काउंटर करून कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे.

  • #WATCH | Will the BJP also shoot those who killed Junaid and Nasir? No, because you (BJP) do encounters in the name of religion. You want to weaken the rule of law, do encounter of the Constitution: AIMIM MP Asaduddin Owaisi in Telangana's Nizamabad pic.twitter.com/H0a1xqRIC3

    — ANI (@ANI) April 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

योगी सरकारवर प्रश्न : उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफच्या कारवाईनंतर ओवैसींची प्रतिक्रिया आली आहे, ज्यामध्ये अतिकचा मुलगा असद, त्याचा साथीदार गुलाम यांचा झाशीत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात युपी पोलिसांना यश आले आहे. यावरुन तेलंगणातील निजामाबादमध्ये एआयएमआयएमच्या रॅलीला संबोधित करताना पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप आणि योगी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यूपीच्या चकमकीवर बोलतांना ओवेसी म्हणाले की, ज्यांनी जुनैद, नसीर यांची हत्या केली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? तुम्ही धर्माच्या नावावर एन्काउंटर करता असा आरोप त्यांनी केला आहे.

न्यायालयाची गरज काय : पुढे बोलतांना ओवैसी म्हणाले की, 'नसीर, जुनैदच्या मारेकऱ्यांना कधी गोळ्या घालणार. मात्र, तुम्ही त्यांना ठार करणार नाही. या प्रकरणात आतापर्यंत एक पकडला गेला आहे, तर नऊ जण फरार आहेत. यावरुन सरकार कायद्याची पायमल्ली करीत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. तुम्हाला राज्यघटनेचे एन्काउंटर करायचे आहे? असाही त्यांनी सवाल मांडला. तुम्हाला कायद्याचे राज्य कमकुवत करायचे असेल तर न्यायालयाचे काम काय आहे. तुम्ही निर्णय घेत असाल तर, न्यायालयाची गरज काय असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आयपीसी कशासाठी आहे? न्यायाधीश कशासाठी आहेत, वकील कशासाठी आहेत. गोळ्या घालून न्याय करणार असे ठरवले तर न्यायालये बंद करण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालय नसेल तर न्यायाधीश काय करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - UP Encounters : योगी आदित्यनाथ सरकारच्या कारकिर्दीत सर्वाधिक एनकाउंटर, चकमकीत १७८ जण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.