ETV Bharat / bharat

2002 Gujarat Riots: नरोडा दंगल प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, विशेष न्यायालयाचा निर्णय

author img

By

Published : Apr 20, 2023, 12:49 PM IST

Updated : Apr 20, 2023, 5:52 PM IST

Ahmedabad Naroda Massacre Case: SIT special Judge will give verdict against 68 accused
नरोडा दंगल प्रकरण, २१ वर्षानंतर विशेष न्यायालय आज सुनावणार शिक्षा

2002 च्या दंगलीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 86 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 86 पैकी आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष न्यायमूर्ती एसके बक्षी यांनी आज याप्रकरणी निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

अहमदाबाद (गुजरात) : नरोडा दंगल प्रकरणी अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. या प्रकरणात भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी यांच्यासह अनेक उजव्या विचारसरणीचे नेते आरोपी आहेत. 2002 च्या गोध्रा दंगलीत अल्पसंख्याक समुदायातील 11 लोक मारले गेले होते. 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद शहरातील नरोडा गाव परिसरात झालेल्या जातीय हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या एक दिवस आधी गोध्रा येथे रेल्वेच्या एका डब्याला आग लागली होती ज्यात अयोध्येहून परतणाऱ्या ५८ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. विशेष न्यायालयाने नरोडा दंगल प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

भाजप, विश्व हिंदू परिषदेचे आरोपी: कोडनानी यांच्यासह बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल हे प्रमुख आरोपी होते. 16 एप्रिल रोजी प्रधान सत्र न्यायाधीश एसके बक्षी यांच्या न्यायालयाने या खटल्याचा निकाल देण्यासाठी 20 एप्रिल ही तारीख निश्चित केली होती. या दंगल प्रकरणातील सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर होते. या प्रकरणातील एकूण 86 आरोपींपैकी 18 आरोपींचा मधल्या काळात मृत्यू झाला. खटल्यादरम्यान सुमारे 182 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले.

अमित शाह यांनी दिली आहे साक्ष: दंगल आणि हत्येव्यतिरिक्त, 67 वर्षीय कोडनानी यांच्यावर नरोडा गाम प्रकरणात गुन्हेगारी कट आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील सप्टेंबर 2017 मध्ये कोडनानीच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून हजर झाले होते.

इतके आहेत साक्षीदार : या प्रकरणात एकूण २५८ साक्षीदार होते. ज्यामध्ये कोर्टाने एकाच वेळी 187 साक्षीदारांची चौकशी पूर्ण केली होती. या प्रकरणात, सरकार, फिर्यादी, बचाव पक्षाने 10,000 पानांचे लेखी युक्तिवाद आणि 100 दाखले दिले होते. पोलीस आणि एसआयटीने एकूण 86 आरोपींना अटक केली होती. एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून, चालू खटल्यादरम्यान 17 आरोपींचा मृत्यू झाला. मृत आरोपींवरील गुन्हे मागे घेण्यात आले. या प्रकरणात 68 आरोपींवर कारवाई करण्यात आली होती. सर्व युक्तिवाद पूर्ण या खटल्यात गेल्या सहा वर्षांपासून तीन न्यायाधीशांसमोर युक्तिवाद सुरू होता, त्यात अखेरचा युक्तिवाद टी.बी. देसाई यांच्या कोर्टात होता जे आता वयोमर्यादेमुळे निवृत्त होत आहे. तो युक्तिवाद दवे यांच्यासमोर पुन्हा सुरू झाला होता.

SIT न्यायाधीश निकाल देणार: SIT विशेष न्यायाधीश शुभदा बक्षी यांनी 68 आरोपींविरुद्ध हा निकाल दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन सकाळपासूनच संपूर्ण न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पोलीस पथकाला सतर्क करण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालाच्या दिवशी सध्याचे एसआयटी प्रमुख मल्होत्रा ​​यांच्यासह अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. शेवटच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विशेष एसआयटी न्यायाधीश शुभदा बक्षी यांनी नरोडा गावाला दोन तास भेट दिली होती.

गावाला दिली भेट: दोन न्यायाधीशांची विशेष भेट SIT च्या विशेष न्यायाधीश शुभदा बक्षी यांनी नरोडा गावाला भेट देऊन SIT चे अधिकारी, फिर्यादी, पीडित आणि वकील यांची विशेष बैठक घेतली होती. दोन तास ते संपूर्ण परिसरात फिरले होते. तत्पूर्वी, विशेष न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश पी.बी.देसाई यांनीही या घटनेची पाहणी करण्यासाठी घटनास्थळ गाठले होते. त्यांनी पीडित, वकील आणि अधिकाऱ्यांची विशेष बैठकही घेतली. न्यायमूर्तींची भेट पाहिल्यावर या प्रकरणाचे गांभीर्य समजू शकते.

हेही वाचा: हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, पहा व्हिडीओ

Last Updated :Apr 20, 2023, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.